बेळगाव, खानापूर, बैलहोंगल विजेते
बेळगाव : गोमटेश विद्यापीठाचे सार्वजनिक शिक्षण खाते व गोमटेश स्कूल आयोजित जिल्हास्तरीय प्राथमिक व माध्यमिक थ्रोबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून बेळगाव शहर, खानापूर तालुका व बैलहोंगल संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत विजतेपद पटकाविले. जिल्हास्तरीय थ्रोबॉल स्पर्धेचे उद्घाटन शहर शिक्षण अधिकारी जे. बी. पटेल, साधना बद्री यांच्या हस्ते करण्यात आले. 14 वर्षाखालील मुलींच्या प्राथमिक गटाततील अंतिम सामन्यात बेळगाव शहर बालिका आदर्शने बेळगाव ग्रामीण गोमटेश हायस्कूल मच्छे संघाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. बेळगाव शहर शहर संघाने 15-12, 15-11 असा विजय मिळविला.
मुलांच्या गटात बेळगाव शहर गोमटेश विद्यापीठ संघाने मराठा मंडळ खानापूर संघाचा 15-10, 15-8 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. 17 वर्षाखालील माध्यमिक गटात अंतिम सामन्यात मुलींच्या विभागात खानापूर तालुक्मयाच्या ताराराणी संघाने सौंदत्ती संघाचा 15-10, 15-9 असा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. तर मुलांच्या गटात बैलहोंगल सरकारी सुतगटी संघाने बेळगाव ग्रामीणच्या व्ही. एस. पाटील संघाचा 15-1 12-5,15-12 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेला विविध स्कूलच्या संघांकडून चांगला प्रतिसाद लाभला असून ही स्पर्ध चुरशीची झाली.