महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव-जोधपूर विमानसेवा होणार बंद

11:27 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दोन महिन्यांत तिसरी विमानफेरी बंद 

Advertisement

बेळगाव : बेळगावमधून एका मागून एक विमानसेवा बंद केल्या जात आहेत. सुरत, किशनगड या दोन शहरांनंतर आता जोधपूर शहराची विमानसेवा 19 जुलैपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बेळगावची उत्तर भारतातील एअर कनेक्टिव्हिटी बंद होणार आहे. उडान योजनेअंतर्गत बेळगाव-जोधपूर विमानसेवा 16 फेब्रुवारी 2021 पासून कार्यान्वित होती. यामुळे प्रवाशांना सवलतीच्या दरामध्ये हा प्रवास करता येत होता. तीन वर्षासाठी ही योजना या मार्गावर लागू करण्यात आली होती. योजनेचा कालावधी मार्च 2024 पासून संपुष्टात आला. मुदत संपल्याने स्टार एअरला उडान योजनेच्या लाभाशिवाय सेवा सुरू ठेवावी लागली होती. उडान योजनेचा लाभ मिळत नसल्याने स्टार एअरने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 19 जुलैपासून कंपनीने या मार्गावरील बुकिंग बंद केले आहे. मंगळवार, गुऊवार, शनिवार व रविवार अशी चार दिवस ही सेवा दिली जात होती. जोधपूर विमानसेवा बंद झाल्यास प्रवाशांचे हाल होणार आहेत.

Advertisement

दिल्ली विमानफेरीच्या वेळापत्रकात बदल

प्रवाशांची गैरसोय होत असल्याने इंडिगोने बेळगाव-दिल्ली विमानफेरीच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 30 जुलैपासून नव्या वेळापत्रकानुसार विमानफेरी सुरू होणार आहे. सकाळी सहा वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचणे प्रवाशांना डोकेदुखीचे ठरत असल्याने वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. दुपारी 1 वाजता दिल्लीहून निघालेले विमान 3.25 वाजता बेळगावला पोहोचेल तर परतीच्या प्रवासात 3.55 वाजता बेळगावहून निघालेले विमान सायंकाळी 6.30 वाजता दिल्ली येथे पोहोचेल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article