बेळगाव मुलींच्या ज्युडो संघाला चौथ्यांदा जेतेपद
बेळगाव : म्हैसूर दसरा स्पोर्ट्स क्रीडा उत्सवात बेळगावच्या युवजन क्रीडा खात्याच्या ज्युडोपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत 4 सुवर्ण, 2 रौप्य, 2 कांस्यपदक पटकावित महिला विभागात चॅम्पयिनशिप (सर्वसाधारण विजेतेपद) पटकाविले. दसरा उत्सव क्रीडा स्पर्धां महाराजांच्या इनडोअर हॉलमध्ये झाल्या.निकाल पुढील प्रमाणे- सहाना बेलागली 57 किलो वजनी गटात सुवर्ण, राधिका डुकरेने 70 किलो गटात सुवर्ण, साईश्वरी कोडचवाडकरने-78 किलो गटात सुवर्ण, भूमिका व्ही. एन.ने 78 किलो गटात सुवर्ण, पार्वती अंबालीने 63 किलो गटात रौप्य,सौरभ पाटीलने 81 किलो गटात रौप्य, दिलशान नदाफने 60 किलो गटात कांस्य, अमृता नाईकने 48 किलो गटात कांस्य, सौरभ भाविकट्टीने 66 किलो गटात कांस्यपदक पटकाविले. या पूर्वी दसरा स्पर्धेत मुलींच्या संघाने चारवेळा जेतेपद पटकविले आहेत. या ज्युडो संघाला उपसंचालक श्रीनिवास बी.यांचे प्रोत्साहन तर प्रशिक्षक रोहिणी पाटील, कुतुजा मुलतानी यांच्या मार्गदर्शन मिळत आहे.