For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव फुटबॉल संघाची विजयी सलामी

06:02 AM Nov 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव फुटबॉल संघाची विजयी सलामी
Advertisement

क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

सार्वजनिक शिक्षण खाते, कोडगू जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुला मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत उद्घाटनच्या दिवशी बेळगाव जिल्हा फुटबॉल संघाने विजयी सलामी दिली.   अम्मती फुटबॉल स्टेडियमवर झालेल्या 17 वर्षांखालील मुलांच्या गटातील पहिल्या सामन्यात बेळगावने म्हैसूरचा 1-0 असा पराभव केला, बेळगाव संघाच्या अब्दुल मुल्लाने एकमेव विजयी गोल केला. दुसऱ्या सामन्यात बेळगावने गुलबर्गाचा 2-0 असा पराभव केला, बेळगाव संघाच्या ईशान देवगेकर, बालाजी यांनी प्रत्येकी 1 गोल केला. 14 वर्षांखालील मुलांच्या गटातील पहिल्या सामन्यात बेळगावने म्हैसूरचा 1-0 असा पराभव केला. बेळगाव संघाच्या नवीन पत्कीने एकमेव गोल केला. 17 वर्षांखालील मुलींच्या गटातील सामन्यात बेळगावने म्हैसूरला गोल शुन्य बरोबरीत रोखले.  14 वर्षांखालील मुलींच्या गटातील सामन्यात बेळगांवने कलबुर्गीचा 2-0 असा पराभव केला. बेळगाव संघाची कर्णधार निधीशा दळवी व धृती शेट्टी यांनी प्रत्येकी 1 गोल केला.

आजचे सामने

Advertisement

►17 वर्षाखालील मुली बेळगाव वि कलबुर्गी सकाळी 7.15 वाजता.

►14 वर्षाखालील मुली बेळगाव वि म्हैसूर सकाळी 8.00 वाजता,

►17 वर्षाखालील मुले  बेळगाव वि बेंगळूर सकाळी 10.30 वाजता.

►17 वर्षाखालील मुली  बेळगाव वि बेंगळूर दुपारी 2.15 वाजता.

►14 वर्षाखालील मुली बेळगाव वि बेंगळूर दुपारी 3.45 वा.

Advertisement
Tags :

.