For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्केटिंग स्पर्धेत बेळगाव जिल्ह्याचे यश

08:55 AM Oct 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्केटिंग स्पर्धेत बेळगाव जिल्ह्याचे यश
Advertisement

राष्ट्रीय एसजीएफआय स्पर्धेसाठी पात्र

Advertisement

बेळगाव : बेळगाव यथे सार्वजनिक शिक्षण खाते यांच्या वतीने 14 व 17 वर्षांखालील  मुला व मुलींची राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत बेळगाव जिल्हा संघाच्या स्केंटींगपटूंनी यश मिळवून एसजीएफआय स्पर्धेसाठी ते पात्र झाले आहेत. ही स्पर्धा शिवगंगा स्पोर्टस क्लब ओमनगर येथे आयोजित करण्यात आले होती. या स्पर्धेसाठी कर्नाटकातून 18 जिल्ह्यातील सुमारे 200 स्केटर्स सहभागी झाले होते. विजयी झालेल्या स्केटर्सची शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेचे बक्षीस वितरण बेळगावचे जिल्हाशिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ यांच्या हस्ते झाले. यावेळी डीएसपी जुनेद पटेल, ज्योती चिंडक, रमेश सिंगद, पीईओ साधना बद्री, नागराज भगवंतण्णवर आदी मान्यवर व स्केटर्स, पालक, प्रशिक्षक उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे-14 वर्षाखालील मुले चेतन गौडा 2 सुवर्ण, भाविश डी 1 सुवर्ण,  वैभव एम 1 रौप्य, ऊत्विक दुब्बाशी 1 रौप्य, 1 कांस्य, मयांक एस. 1 रौप्य, आर्यन मंजुनाथ 1 कांस्य, 14 वर्षाखालील मुला विभाग  आफरीन ताझ 2 सुवर्ण, इश्नवी के.  1 सुवर्ण, 1 रौप्य, निकिता उपाध्याय 1 रौप्य, 1 कांस्य, स्पंदना 1 कांस्य, दीपिका 1 रौप्य, फलक निगार 1 कांस्यपदक मिळविले. 17 वर्षाखालील मुले- के. कार्तिक कश्यप 1 सुवर्ण, 1 कांस्य, शल्या तारळेकर 1 रौप्य, निर्मय वाय. एन. 1 सुवर्ण, 1 रौप्य, अक्षय के. 2 कांस्य, किरण बेनी 1 रौप्य, 1 सुवर्ण, 17 वर्षाखालील मुली-जान्हवी तेंडुलकर 2 सुवर्ण, धनथा 1 सुवर्ण, 1 रौप्य, ग्रीष्मा शेट्टी 1 रौप्य, सौजन्या शेषगिरी 2 कांस्य, बिंदू बी. एम. 1 कांस्य, 1 रौप्य पदक मिळविले.

Advertisement

इनलाइन स्केटिंग निकाल- 14 वर्षाखालील मुले- अवनीश कामन्नावर 2 सुवर्ण, 1 रौप्य, अर्जुन कोटीयन 1 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कांस्य, सय्यद फैजल 2 रौप्य, 1 कास्य, मधु शेट्टी 1 सुवर्ण, वैभव उपाध्ये 1 कांस्य, विहान कोडगू 1 कांस्य, 14 वर्षाखालील मुली-स्पूर्ती गुजराल 3 सुवर्ण, वैष्णवी माने 1 सुवर्ण, 2 रौप्य, एस. एल. शर्वरी 1 रौप्य, 1 कांस्य, दक्षा शिवकुमार 2 कांस्य, अन्वी सोनार 1 कास्य, मोक्षिता एम. एस. 1 रौप्य,  17 वर्षाखालील मुले-माऊती नायक 3 सुवर्ण, सनथ अनाडिया 2 रौप्य, 1 कांस्य, वैष्णव उपाध्य 1 सुवर्ण, 1 रौप्य 1 कांस्य, इशान नागुली 1 रौप्य, क्षितिज ए. 2 कास्य, 17 वर्षाखालील मुली-हॅना रोझ 3 सुवर्ण, प्रीथा पी. ए. 2 रौप्य, 1 सुवर्ण, रश्मिता अंबिगा 1 रौप्य 2 कांस्य, यास्मिन ताशिलदार 1 रौप्य, 1 कांस्य, श्रीरक्षा 1 कांस्य.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ यळ्ळूरकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे, अनुष्का शंकरगौडा, सक्षम जाधव, सोहम हिंडलगेकर, श्री रोकडे, तेजस सांळुखे, ऋषीकेश पसारे, स्वरूप पाटील व बेळगावी जिल्हा सार्वजनिक शिक्षण खाते व बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Advertisement
Tags :

.