महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आमदारांशी चर्चेनंतर जिल्हा विभाजनाचा निर्णय

12:03 PM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे वक्तव्य : आम्ही एकत्रितपणे राजकीय षड्यंत्राविरुद्ध लढा देऊ : आपल्याला जनतेचा पाठिंबा

Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्हा विस्ताराने मोठा आहे. जिल्हा विभाजनासंबंधी आमदारांशी चर्चा करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. विविध कार्यक्रमात भाग घेण्यासाठी सोमवारी विशेष विमानाने मुख्यमंत्र्यांचे सांबरा विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन सायंकाळी मुख्यमंत्री विशेष विमानाने बेंगळूरला रवाना झाले. यावेळी जिल्हा विभाजनासंबंधी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना बेळगाव जिल्हा हा मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या विभाजनासंबंधी आमदारांशी चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मुडा भूखंड वाटप प्रकरणावरून भाजप-निजद नेत्यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध आघाडी उघडलेली असतानाच बेळगाव जिल्ह्याचा दौरा करून जोपर्यंत लोकांचा पाठिंबा आहे, तोपर्यंत कोणीच आपल्याला धक्का पोहोचवू शकत नाही, असा संदेश आपल्या राजकीय विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

Advertisement

पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विनय नावलगट्टी, आमदार महांतेश कौजलगी, आमदार राजू सेठ, माजी आमदार वीरकुमार पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, मृणाल हेब्बाळकर यांच्यासह जिल्ह्यातील नेत्यांनी विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, खून प्रकरणात परप्पन अग्रहार कारागृहात असलेला चित्रपट अभिनेता दर्शनची कारागृहात बडदास्त ठेवल्याच्या आरोपावरून सात जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दर्शन व त्याच्या साथीदारांना इतर कारागृहात हलविण्याची सूचना करण्यात आली आहे. आणखी काही जणांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या पातळीवर ही चूक घडली आहे. कारागृहाला भेट देऊन पाहणी करण्यासंबंधी आपण गृहमंत्र्यांना सूचना केली आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या अहवालावरून आणखी काही जणांवर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकारानंतर दर्शन व त्याच्या साथीदारांना इतर कारागृहात हलविण्यासंबंधी सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article