कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Belgaum News: बेळगावचे DCP रोहन जगदीश यांच्यासह 34 IPS अधिकाऱ्यांची बदली

01:58 PM Jul 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बदल्यांमध्ये राज्यभरातील अनेक DCP, SP आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आलीये

Advertisement

बेळगाव : राज्य सरकारने मंगळवारी ३४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी केला. यामध्ये बेळगावचे डीसीपी रोहन जगदीश यांची गदग जिल्ह्याचे पोलीस प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने त्यांना सुमारे दोन वर्षांपूर्वी बेळगाव पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीत कायदा आणि सुव्यवस्थेचे डीसीपी म्हणून नियुक्त केले होते. सरकारने बंगळुरु वाहतूक पोलिस विभागाचे डीआयजी एम.एन. अनुचेथ आणि दक्षिण कन्नडचे कायदा आणि सुव्यवस्थेचे डीसीपी जितेंद्र कुमार यांच्यासह ३४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. कर्नाटक राज्य पोलीस विभागात मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, या बदलांमध्ये राज्यभरातील अनेक DCP, SP आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediabelgaum policeBlgaum Newspolice
Next Article