बेळगाव शहर-ग्रामीण संघ अंतिम फेरीत
बेळगाव : टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना, संत मीरा, जी. जी. चिटणीस, बालिका आदर्श शाळेच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या जिल्हास्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुला-मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत बेळगाव शहर व बेळगाव ग्रामीणच्या संघांनी अंतिम धडक मारली.
अनगोळ येथील संत मीरा शाळेच्या मैदानावर स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाचे प्रकाश पाटील, शहराचे गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री, बेळगाव ग्रामीणचे गटशिक्षणाधिकारी एस. पी. दासपणावर, जहिदा पटेल, साधना बद्री, क्रीडाभारतीचे राज्यसचिव ए. बी. शिंत्रे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव उमेश कुलकर्णी, जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर. पी. वंटगुडी, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, नवीना शेट्टीगार, एन. ओ. डोणकरी, हनुमान स्पोर्ट्सचे आनंद सोमण्णाचे, टिळकवाडी शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष विवेक पाटील उपस्थित होते. दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन झाले.
क्रीडाशिक्षक नारायण पाटील, ठळकवाडी शाळेचे क्रीडाशिक्षक विवेक पाटील, संत मीरा शाळेचे प्रशिक्षक शिवकुमार सुतार, यश पाटील, मयुरी पिंगट यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी क्रीडाशिक्षक जयसिंग धनाजी, बापू देसाई, उमेश मजुकर, प्रवीण पाटील, सचिन कुडची, नागराज भगवंतण्णावर, सी. आर. पाटील, प्रकाश बजंत्री, सुनिल बेळगुंदकर, आनंद पाटील, पी. एस. कुरबेट, चिंतामणी, डॉ बुलबुले, देवेंद्र कुडचीसह विविध तालुक्यातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते. या जिल्हास्तरीय स्पर्धेत बेळगांव शहर, बेळगाव ग्रामीण, कितुर, सौंदत्ती, बैलहोंगल खानापूर तालुक्यातील 14 व 17 वर्षे मुला-मुलींच्या संघानी भाग घेतला होता.