महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव बुफा संघ उपविजेता

10:18 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेंगळूर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्यावतीने बेंगलोर येथे आयोजित बीडीएफए 17 वर्षांखालील अंतिम सामन्यात बेंगळूरच्या अलकेमी इंटरनॅशनलने बेळगावच्या बुफा युनायटेड संघाचा 1-0 असा निसटता पराभव करून अजिंक्यपद पटकावले. बीडीएफए फुटबॉल मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बुफा बेळगावने डीवाईएस संघाचा 3-0 असा पराभव केला. बुफातर्फे रॅनलने दोन तर सुमितने एक गोल केला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अलकेमी इंटरनॅशनल संघाने बेंगळूर युनायटेचा 1-0 असा पराभव केला. पी. रघूने एकमेव गोल केला. अंतिम सामन्यात अलकेमी इंटरनॅशनल संघ व बुफा युनायटेड बेळगाव यांच्यात झाला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या सत्रात 82 व्या मिनिटाला अलकेमी संघाच्या रघुराजनने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बुफाने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. शेवटी हा सामना अलकेमी इंटरनॅशनल संघाने 1-0 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. बेळगावच्या बुफा संघाच्या जबरदस्त बचाव खेळीपुढे अलकेमी संघाने एकच विजयी गोल नोंदविला. 26 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या बाद फेरीच्या साखळी सामन्यात बुफा संघाने अखेरपर्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली. अंतिम सामन्यातील या संघाने निखराची झुंज दिली. सामन्यानंतर ऑल इंडिया फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष व कर्नाटक फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष एन. ए. हॅरीश, सचिव कुमार यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाला चषक, प्रमाणपत्र व रोखरक्कम देऊन गौरविण्यात आले. या संघाला प्रशिक्षक मतीन इनामदार, हेमांशी कौर यांचे मार्गदर्शन लाभले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article