For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गती वाढविल्यास बेळगाव-बेंगळूर वंदे भारत धावणे शक्य

11:15 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
गती वाढविल्यास बेळगाव बेंगळूर वंदे भारत धावणे शक्य
Advertisement

राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांची नैर्त्रुत्य रेल्वेला सूचना : रेल्वे विकासकामांबाबत केली चर्चा

Advertisement

बेळगाव : धारवाड ते बेंगळूर वंदे भारत एक्स्प्रेस ताशी 80 ते 90 कि. मी. वेगाने धावत असल्याने प्रवासाचा कालावधी वाढत आहे. वंदे भारत एक्स्प्रेसची क्षमता ताशी 120 कि. मी. असल्याने या गतीने एक्स्प्रेस धावल्यास प्रवासाचा कालावधी कमी होऊ शकतो. हा कालावधी कमी झाल्यास बेळगाव-बेंगळूर वंदे भारत एक्स्प्रेस अवघ्या 7 तासांत बेंगळूरला पोहोचेल. अशा पद्धतीने नैर्त्रुत्य रेल्वेने नियोजन करून लवकरच वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करावी, अशी सूचना राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी नैर्त्रुत्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांना केली. मंगळवारी नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी येथील विभागीय कार्यालयात खासदार तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बेळगाव जिल्ह्याशी संबंधित प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वे मार्गाच्या भू-संपादनाचे काम लवकर पूर्ण करून येत्या दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

बेळगाव-गोवा इंटरसिटी पूर्ववत करण्याबाबत चर्चा

Advertisement

यशवंतपूर-पंढरपूर एक्स्प्रेस मिरज रेल्वेस्थानकात तब्बल तासभर थांबते. या ऐवजी या एक्स्प्रेसला खानापूर, घटप्रभा, रायबाग या रेल्वे स्थानकात थांबा दिल्यास प्रवाशांची सोय होईल. बेळगाव-मिरज मार्गावर आणखी दोन पॅसेंजर रेल्वे सुरू करणे तसेच बेळगाव-गोवा इंटरसिटी पूर्ववत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. नैर्त्रुत्य रेल्वेचे सरव्यवस्थापक अरविंद श्रीवास्तव यांनी या मागण्यांचा विचार करू, असे आश्वासन दिले.

बेळगाव-मुंबई रेल्वेबाबत सकारात्मक चर्चा

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे बेळगावमधून मुंबईला जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे बेळगाव-मुंबई या मार्गावर स्वतंत्र एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. याबरोबरच मिरज-मंगळूर, बेळगाव-अयोध्या, आग्रा, मथुरा व दिल्ली या शहरांसाठी साप्ताहिक रेल्वे सुरू करण्याबाबत चर्चा झाली. बेळगाव-पुणे वंदे भारत सुरू करण्याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी यापूर्वीच पत्र दिले होते. त्यामुळे ही वंदे भारत लवकरच सुरू करण्यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेने प्रयत्न करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

Advertisement
Tags :

.