For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव विमानतळाची प्रवासीसंख्येत आघाडी

11:15 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव विमानतळाची प्रवासीसंख्येत आघाडी
Advertisement

मे मध्ये 32 हजार जणांचा प्रवास : संख्येत दिवसागणिक वाढ

Advertisement

बेळगाव : बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मे महिन्यात 30 हजारांचा टप्पा ओलांडत तब्बल 32,045 प्रवाशांनी विमानप्रवास केला आहे. त्यामुळे मे महिन्यात 3.17 टक्क्यांनी वाढ दिसून आल्याने आता बेळगावला नव्या विमानफेऱ्या देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या बेळगावमधून इंडिगो व स्टार एअर या दोन कंपन्या विमानसेवा देत आहेत. इंडिगोकडून बेंगळूरला दररोज दोन विमाने तर दिल्ली व हैदराबाद येथे रोज एक विमान प्रवास करते. स्टार एअर अहमदाबाद, मुंबई, नागपूर, जोधपूर, जयपूर व तिरुपती या सहा शहरांना विमानसेवा देते.एप्रिलमध्ये 31,086 प्रवाशांनी विमानप्रवास केला. मेमध्ये 32,045 प्रवाशांनी विमानप्रवास केल्याची नोंद आहे. या महिन्यात 2.3 मेट्रिक टन कार्गो वाहतूक केली आहे. प्रवासी संख्येसोबतच मालवाहतूकही वाढत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. एकीकडे विमानफेऱ्या रद्द केल्या जात असताना प्रवासीसंख्या वाढत असल्याने नवीन विमानफेऱ्या सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दीड लाख प्रवाशांची बेळगावला पसंती

Advertisement

महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यांच्या सीमेवरील बेळगाव विमानतळाला प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. पाच महिन्यांत तब्बल 1 लाख 52 हजार 565 प्रवाशांनी बेळगावमधून प्रवास केल्याची नोंद आहे. जानेवारीत 29 हजार 614, फेब्रुवारीत 29,530, मार्चमध्ये 30,290, एप्रिलमध्ये 31,086 तर मे मध्ये 32,045 प्रवाशांनी प्रवास केल्याचे विमानतळ प्राधिकरणकडून सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.