महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळवट्टी ग्रा. पं. भ्रष्टाचाराची अधिकाऱ्यांकडून चौकशी

10:38 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विविध विकासकामे राबविली असली तरी प्रत्यक्षात कामे झालीच नसल्याचा ठपका : पीडीओ-सदस्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा दलित बांधव-नागरिकांचा आरोप

Advertisement

वार्ताहर /किणये

Advertisement

बेळवट्टी ग्रामपंचायतमध्ये विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. विविध प्रकारची कामे राबविण्यात आली असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र कामे झालीच नाहीत. ग्रामपंचायत पीडीओ व सदस्यांनी या पंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप बेळवट्टी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दलित बांधव व नागरिकांनी केला. या भ्रष्टाचाराच्या विरोधात जानेवारी महिन्यात ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून काढण्यात आला होता. या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी प्रशासनाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी बेळवट्टी ग्रामपंचायतला भेट देऊन त्या भ्रष्टाचाराची चौकशी केली आहे.

बेळवट्टी ग्रा.पं.मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप दलित बांधवांनी केला होता. या ग्रा. पं.मध्ये 50 रुपयाच्या संगणक उताऱ्यासाठी 15000 रुपये सर्वसामान्य नागरिकांकडून घेण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच घरबांधणीसाठी मेजरमेंट चेकबंदीही पंचायतीच्या कार्यालयात बसूनच अंदाजे घालण्यात आली आहे. एससी एसटी फंड पूर्णपणे हडप केला आहे, अशी तक्रार आहे. विद्यार्थ्यांना संगणकासाठी ऍडमिशन म्हणून दाखविले आहे. तसेच संगणक शिकवणी करण्यात आल्याचे कागदोपत्री दाखवून पैसे काढले आहेत. प्रत्यक्षात मात्र पंचायत कार्यक्षेत्रातील एकाही विद्यार्थ्याला याचा लाभ मिळाला नाही, अशी माहिती दिली. स्वच्छता कामकाजाच्या नावाखालीही निधी लाटण्यात आला आहे असा आरोप केला आहे. याचबरोबर पाणी समस्या निवारण्यासाठी म्हणून योजना राबविण्यात आली. यासाठी सुमारे 60 लाख रुपये इतका निधी खर्च करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात मात्र पाणी समस्येसाठी काम झाले नसल्याचा आरोपही यावेळी सदर नागरिकांनी केला.

भ्रष्टाचारांवर कडक कारवाई करा

जानेवारी महिन्यात दलित बांधवांनी या भ्रष्टाचाराच्या विरोधात ग्रामपंचायतवर मोर्चा काढून निवेदन दिले होते. तसेच भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही केली होती. त्यानंतर तालुका पंचायत समाज कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी बेळवट्टी ग्रामपंचायतला भेट देऊन पाहणी केली होती. तसेच पुन्हा शुक्रवारी पोलीस प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी बेळवट्टीत दाखल होऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर त्या वेळेच्या पीडिओ श्रीदेवी हिरेमठ यांची अन्य ठिकाणी बदली झाली आहे. त्यांची बदली नेमकी प्रशासनाकडून झाली की भ्रष्टाचाराच्या आरोपाला घाबरून त्यांनी स्वत:हून बदली करून घेतली, अशी चर्चाही या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांमध्ये सध्या सुरू आहे. शुक्रवारी आलेल्या पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांनी सध्याचे पीडिओ यांना सदर कागदपत्रे हजर करण्याचे सांगण्यात आले आहे. बेळवट्टी ग्रामपंचायतच्या एससी एसटी फंडामध्ये अधिक प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप दलित बांधवांनी केला आहे. त्यामुळे बेळवट्टी ग्रा.पं.च्या भ्रष्टाचाराची सध्या तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.

सध्याच्या पीडीओंची तारांबळ

त्यावेळी ग्रामपंचायतसमोर सुमारे दोन तास नागरिक बसून होते. अखेर तालुका पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनवाडकर व तालुका पंचायतीचे समाज खात्याचे अधिकारी महांतेश सवतगुंडी हे दाखल झाले. त्यांना ग्रामस्थांनी व दलित बांधवांनी भ्रष्टाचाराची संपूर्ण माहिती दिली व ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती. दलित संघटनेचे महेश कोलकार, मारुती उर्फ मुन्ना कांबळे, अरुण कांबळे, विलास कांबळे नारायण नलावडे, एन. के. नलवडे, डॉ. अर्जुन पाटील, सुरेश नाईक, नारायण कांबळे, मधुकर देसाई, चेतन पाटील, विनोद कांबळे आदींसह बेळवट्टी, बाकनुर, इनाम बडस, धामणे एस. गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या निवेदनानंतर सदर भ्रष्टाचाराचे प्रकरण अधिक चिघळले आहे. तालुका पंचायतीच्या समाज कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी पंचायतीमध्ये भेट देऊन भ्रष्टाचाराची चौकशी केली. तसेच शुक्रवारी पुन्हा एसपी कार्यालयातील पोलीस अधिकारी गावात दाखल झाले. यामुळे सध्या असलेल्या पीडिओची तारांबळ उडाली होती.

जानेवारीत मोर्चा, उडवाउडवीची उत्तरे

जानेवारी महिन्यात ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून दलित बांधवांनी ग्रामपंचायतसाठी मंजूर झालेला निधी गेला कुठे? असे ठणकावून विचारले असता सदस्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच सदस्यांनी ठराव करूनच निधी काढला असेही सांगितले. तर उपस्थित सदस्यांनी आम्हाला अधिक माहिती नाही तुम्ही पीडीओंना विचारा, असे सांगितले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article