महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव स्पोर्ट्स क्लब, हुबळी स्पोर्ट्स क्लब,संघ विजयी

09:59 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससी ए सेकंड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत आज खेळविण्यात आलेला सामन्यात हुबळी स्पोर्ट्स क्लब बी ने नीना स्पोर्ट्सचा नऊ गड्यांनी पराभव करून तर बेळगाव स्पोर्ट्स क्लबने जानो पॅन्थर संघाचा पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळवले. माधव धारवाडकर व ध्रुव देसाई यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. ऑटोनगर येथील केएससीए मैदानावरती खेळविण्यात झालेल्या सामन्यात नीना स्पोर्ट्स क्लब अ ने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 गडीबाद 196 धावा केल्या. त्यात अंगदराज हितलमनीने  1 षटकार 14 चौकारांसह 102 धावा करून शतक झळकविले. त्याला अभिषेक शर्माने 48 तर अंजुमपरवेज मोरबने 17 धावा केल्या.

Advertisement

हुबळी स्पोर्ट्स क्लब तर्फे यावक रे•ाr व विनायक पांडे, माधव धारवाडकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना हुबळी स्पोर्ट्स क्लब ब ने 21.1 षटकात एक गडी बाद 198 धावा करून सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात माधव धारवाडकरने 5 षटकार व 17 चौकारांसह 120 धावा करून शतक झळकविले त्याला वीरेंद्र सांबराणीने 61 धावा करून सुरेख साथ दिली. नीना तर्फे माझीद मकानदारने एक गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने  प्रथम फलंदाजी करताना 44.5 षटकात सर्व गडीबाद 242 धावा केल्या. त्यात ध्रुव देसाईने 6 षटकार व 14 चौकारांसह 110 धावा करुन शतक झळकविले. त्याला शिवम नेसरीकरने 1 षटकार 4 चौकारांसह 38, साई कारेकरने 4 चौकारांसह 10 धावा करुन सुरेख साथ दिली. जानो पॅन्थर तर्फे किरण दिगेने 33 धावांत 4, विशाल कबाटीने 45 धावांत 3 गडीबाद केले.  प्रत्युत्तरादाखल खेळताना जानो पॅन्थर संघाचा डाव 27.5 षटकात 99 धावांत आटोपला.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article