For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सडपातळ असणे ठरले संकट

06:06 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
सडपातळ असणे ठरले संकट
Advertisement

वाहन चालविण्यावर बंदी, रद्द झाला परवाना

Advertisement

सडपातळ होण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते, यासाठी लोक बरेच उपाय करत असतात. परंतु सडपातळ आणि तंदुरुस्त असण्यात फरक आहे. अन्यथा तुम्ही देखील एका इसमाप्रमाणे अडचणीत येऊ शकता. एक व्यक्ती इतका सडपातळ झाला की त्याच्यावर वाहन चालविण्यास बंदी घालण्यात आली. तसेच त्याचा वाहन चालविण्याचा परवाना देखील रद्द करण्यात आला. यामुळे त्याला अनेक वर्षापर्यंत स्वत:ची कार चालविता आली नाही.

ब्रिटनमध्ये राहणारे जो रोजर्स यांच्यासोबत हा प्रकार घडला. जो यांना एनोरेक्सिया नावाचा ईटिंग डिसऑर्डर होता. यामुळे पीडित व्यक्तीमध्ये नेहमीच वजन वाढण्याची भीती वरचढ ठरत असल्याने तो खाणेच सोडून देतो. अनेकदा पीडित व्यक्ती खाल्ल्यावर उलटी करत असतो. याचमुळे अनेक लोक भूकेने तडफडल्यावरही जेवणे टाळतात. रोजर्स यांच्यासोबत देखील हेच घडले. न खाल्ल्याने त्यांचे वजन सातत्याने कमी होत गेले.

Advertisement

अनफिट घोषित

रोजर्स इतके सडपातळ झाले की ब्रिटनच्या परिवहन विभागाने त्यांना अनफिटच घोषित केले. त्यांच्या वाहन चालविण्यावर बंदी घालण्यात आली. तसेच वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्यात आला. प्रथम स्वत:ची प्रकृती सुधारा, मगच वाहन चालिवण्याचा परवाना मिळेल अशी ताकीद देण्यात आली. यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले, उपचार करवून घेतले, यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

सर्वप्रथम आईला आजाराविषयी कळले

माझ्या आजाराविषयी सर्वप्रथम माझ्या आईला कळले होते. माझ्या खाण्याचा पॅटर्न बदलल्याचे तिच्या लक्षात आले होते. मी आईसोबत मॅकडोनाल्ड्समध्ये गेलो होतो, तेथे सर्वकाही होते, तरीही मी काहीच खायचे नसल्याचे सांगितले होते. यानंतर घरी देखील हाच प्रकार घडत होता. मी अन्न खायचे सोडून देत होतो. केवळ खाल्ल्याचे ढोंग करत होतो असे रोजर्स यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.