बियरचा स्वीमिंग पूल
प्रत्येक जण घेतो पोहण्याचा आनंद
स्वीमिंग पूलची क्रेझ सर्वाधिक असते. उन्हाळ्यात हॉटेलपासून रिजॉर्टपर्यंत स्वीमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी चढाओढ दिसून येते. पाण्यासोबत बियरच्या स्वीमिंग पूलचाही लोक पोहण्यासाठी वापर करत आहेत. असाच एक बियरचा स्वीमिंग पूल तयार करण्यात आला आहे.
लोक हॉटेल, रिजॉर्ट समवेत अन्य ठिकाणी जात तेथील स्वीमिंग पूलमध्ये पोहत असतात. उन्हाळ्यात स्वीमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद काही औरच असतो. बहुतांश मोठी हॉटेल्स आणि रिजॉर्टमध्ये स्वीमिंग पूल असतात. जगभरात मद्यपान करणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. अनेक देशांमध्ये लोक उन्हाळ्यात सर्वाधिक बियर पिणेच पसंत करतात. अशाच एका ठिकाणी बियरचा स्वीमिंग पूल आहे.
ऑस्ट्रियातील या स्वीमिंग पूलमध्ये पाणी नव्हे तर बियर असते. या स्वीमिंग पूलमध्ये लोक मोठ्या आवडीने येतात आणि पोहण्याचा आनंद घेतात. ऑस्ट्रेलियाच्या टेरेंट्जमध्ये जगातील पहिला बियर स्वीमिंग पूल सुरू झाला आहे. टेरेट्जच्या शलोस स्टारर्कनबर्गर ब्रेवरीमध्ये असे 7 स्वीमिंग पूल असून ते 13 फूट लांब आहेत. या बियरमध्ये स्नान करण्यासाठी 16,518 रुपये खर्च करावे लागतात.
बियर त्वचेला कॅल्शियम आणि व्हिटॅमिन पुरवून त्याला नरम करत असल्याचे मानले जाते. यामुळे रक्तदाबाच्या स्थितीतही सुधारणा होता. हे बियर स्वीमिंग पूल्स एका प्राचीन महालात निर्माण करण्यात आले आहेत. येथे बियरमध्ये पोहण्यासोबत फ्रेश बियरची ऑर्डर करून ती पिता येते.