कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुड फ्रायडेचा कार्यक्रम सुरू असताना मधमाशांचा हल्ला

05:10 PM Apr 18, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

४० जणांवर उपचार सुरु ; वरवडे - फणसनगर येथील घटना

Advertisement

कणकवली /प्रतिनिधी

Advertisement

वरवडे फणसनगर येथील चर्चच्या ठिकाणी गुड फ्रायडे निमित्त कार्यक्रम सुरू असताना अचानक मधमाशांनी हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन बांधव जखमी झाले असून त्यातील 40 जणांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. शुक्रवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास गुड फ्रायडे निमित्तचा कार्यक्रम सुरू असताना मधमाशांनी हा हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उबाठाशिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. तसेच पोलीस निरीक्षक मारुती जगतापही दाखल झाले होते. डॉ. पंकज पाटील, यांच्यासहित डॉ.अक्षय पाटील, डॉ.अजय शृंगारे, डॉ. सुजीता मंचिकलपुडी, डॉ. चंद्रतेज बी त्यांच्या सहित प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकारी तसेच परिचारिका नुपूर पवार, दिपाली ठाकूर, नयना मुसळे यांच्यासहित इतर कर्मचाऱ्यांनी मदत केली.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # sindhudurg news # kankavli
Next Article