For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुंदर दिसणारे चॉकलेट हिल्स

07:00 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुंदर दिसणारे चॉकलेट हिल्स
Advertisement

नैसर्गिक आश्चर्यांमध्ये चॉकलेट हिल्स पाहणे अनोखा अनुभव आहे. या अद्वितीय भूवैज्ञानिक संरचनांमध्ये जवळपास 200 शंकूच्या आकारातील पर्वत सामील आहेत, जे 50 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात फैलावलेले आहेत. ‘चॉकलेट हिल्स’ हे नाव या पर्वतांच्या रंगामुळे त्याला मिळाले आहे. उन्हाळ्यात हे पर्वत एखाद्या चॉकलेटच्या स्वादिष्ट ढिगाऱ्यांप्रमाणे दिसून येतात. फिलिपाईन्सच्या बोहोल प्रांतात असलेले चॉकलेट हिल्स अद्वितीय आणि मनमोहक नैसर्गिक आश्चर्य आहे. हे पर्वत 50 चौरस किलोमीटरच्या भागात फैलावलेले आहेत आणि यात सुमारे 1268 वेगवेगळे ढिग आहेत. पर्वतांच्या असामान्य शंकूच्या आकाराच्या आकृत्या पिढ्यांपासून पर्यटक आणि स्थानिक लोकांना आकर्षित करण्याचे काम करत राहिल्या आहेत. याचमुळे या ठिकाणाला हे अनोखे नाव मिळाले आहे.

Advertisement

चॉकलेट हिल्सचा रंग उन्हाळ्यात बदलू लागतो. या पर्वतांवरील गवत सुकू लागल्यावर दृश्यात नाट्यामय परिवर्तन होते. यानंतर हे पर्वत चॉकलेटी रंगाच्या ढिगाऱ्यांप्रमाणे दिसू लागतात. चॉकलेट हिल्सला फिलिपाईन्सचे राष्ट्रीय भूवैज्ञानिक स्मारक घोषित करण्यात आले आहे. याचबरोबर स्वत:च्या असाधारण मूल्यामुळे चॉकलेट हिल्सला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत सामील करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यामुळे या ठिकाणाल जगभरात महत्त्व प्राप्त होऊ शकणार आहे. सर्वसाधारणपणे पर्वतांची संख्या 1268 सांगण्यात आली आहे. चॉकलेट हिल्सची अचूक संख्या चर्चा आणि भूवैज्ञानिक अध्ययनाचा विषय ठरली आहे. त्यांच्या अचूक संख्येबाबत अद्याप ठोस घोषणा करण्यात आली नाही. एका खास ऋतूदरम्यान पर्वत चॉकलेटसारख्या रंगात बदलतात, तर उर्वरित बहुतांश काळात चॉकलेट हिल्स हिरव्या गालिचाने आच्छादलेले असतात. हे हिरवेगार दृश्य उन्हाळ्यातील चॉकलेटी रंगाच्या स्वरुपाच्या विरुद्ध एक आकर्षक विरोधाभास निर्माण करतात. चॉकलेट हिल्स स्थानिक लोककथा आणि पौराणिक कथांमध्ये देखील स्थान मिळवून आहे. चॉकलेट हिल्स आकर्षक कहाण्या आणि वदंतांसाठी प्रेरणास्रोत आहे. या कहाण्या पर्वतांच्या आकर्षणात आणखी भर घालतात.

Advertisement
Advertisement
Tags :

.