जागेत गुरे चारण्यास नेल्याने केली मारहाण ! चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चिपळूण प्रतिनिधी
तालुक्यातील धामणवणे-शिगवणवाडी येथे एका जागेत गुरे चरवण्यासाठी नेल्याने रागातून एकाने त्या गुराख्यास मारहाण केल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली. यापकरणी मारहाण करणायावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन शिवराम शिगवण (धामणवणे-शिगवणवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची वसंत गोपाळ उदेग ( ६५,धामणवणे-शिगवणवाडी) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास वसंत उदेग हे धामणवणे-शिगवणवा डी येथे एका ठिकाणी गुरे चरवण्यासाठी गेले होते. गुरे चरविण्यासाठी गेलेले ठिकाण चेतन शिगवण याच्याच मालकीचे असल्याचे मानून तो वाडीतील सर्व लोकांना त्याठिकाणी कोणीही गुरे चरविण्यासाठी जावू नका असे सांगत असतो. असे असताना त्याठिकाणी वसंत उदेग हे त्याठिकाणी गुरे चरविण्यासाठी गेले असता याचा राग मनात धरुन शिगवण याने उदेग यांच्या हातातील काठी हिसाकावून त्यांना मारहाण केली. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.