महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डेंग्यू थोपविण्यासाठी सतर्क रहा

11:27 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची सूचना : चिकोडी येथील माता-बालक इस्पितळाचे 15 ऑगस्टला होणार उद्घाटन

Advertisement

बेळगाव : बेळगावसह राज्यात डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. डेंग्यू थोपविण्यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक उपाययोजना करावी, जिल्ह्यातील सर्व सरकारी इस्पितळात तपासणी किट उपलब्ध करून द्यावेत, रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक औषधसाठाही करावा. याचबरोबर चिकोडी येथील माता व बालक इस्पितळाचे उद्घाटन 15 ऑगस्ट रोजी करण्यासाठी तयारी करावी, अशी सूचना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली.

Advertisement

शुक्रवारी सुवर्णविधानसौध येथे झालेल्या कर्नाटक विकास आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना वरील सूचना केल्या. चिकोडी येथील माता व बालक इस्पितळाचे काम पूर्ण झाले आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती झाली आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी तयारी करावी. बेळगाव येथील सुपरस्पेशालिटी इस्पितळासाठी पुरविण्यात आलेल्या अत्याधुनिक यंत्रोपकरणाचा लाभ सर्वसामान्य रुग्णांना करून द्यावा, अशा सूचना केल्या. डेंग्यूचा फैलाव वाढू नये यासाठी खबरदारी घ्यावी. सरकारी इस्पितळात मुबलक औषधसाठा करून ठेवावा. डेंग्यू रुग्णांवर त्वरित उपचार करावेत. डेंग्यू थोपविण्यासाठी नागरिकांनी काय करावे? यासाठी जागृती करण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी केली असून जिल्ह्यातील शाळांमध्ये डेस्क खरेदीसाठी उपलब्ध असलेल्या अनुदानाचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांची सोय करावी. बेळगाव व चिकोडी जिल्ह्यासाठी लवकरच शिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, असे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

जिल्ह्यात उत्तम पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे व खतांची कमतरता भासू नये, यासाठी अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना त्वरित भरपाई द्यावी. जलजीवन मिशनअंतर्गत अपूर्ण राहिलेली कामे त्वरित पूर्ण करून पाणीपुरवठ्याची सोय करावी, अशी सूचना देतानाच पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात स्थापन करण्यात येणाऱ्या नव्या वीज वितरण केंद्रांची माहिती घेतली. शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मर त्वरित दुरुस्त करण्याच्या सूचनाही हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. रायबाग तालुक्यातील तलावात पाणी भरण्याचे काम त्वरित पूर्ण करावे. स्थानिक आमदारांबरोबर समन्वय राखून हे काम करावे. यासंबंधी लवकरच रायबागमध्येही बैठक घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रात पाऊस वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर येऊ शकतो. संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. नदीकाठावरील नागरिकांना खबरदारी घेण्यासंबंधी जागृती करावी, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली.

वायव्य परिवहनचे अध्यक्ष राजू कागे यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा केवळ दर्जा वाढवून उपयोग होणार नाही. दर्जा वाढविण्यासह आवश्यक डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा सल्ला दिला. राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणावर प्रकाश टाकून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना त्वरित भरपाई देण्याची मागणी केली. आमदार राजू सेठ यांनी बिम्समध्ये डॉक्टर, परिचारिका व तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. ही कमतरता दूर करण्याची मागणी केली. विधानपरिषद सदस्य नागराज यादव यांनी बिम्समधील खाटांची संख्या, डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याचा सल्ला दिला. चिकोडीतही एक जिल्हा इस्पितळ सुरू करण्याचा सल्ला दिला. बैठकीत खासदार प्रियांका जारकीहोळी, आमदार महांतेश कौजलगी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, पोलीस आयुक्त यडा मार्टीन मार्बन्यांग, जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद, यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. याचवेळी महिला स्वसाहाय्य संघटनांना गणवेश वितरण करण्यात आला. याच बैठकीत नशेत शाळेला येणाऱ्या शिक्षकांविषयीही चर्चा झाली.

अधिकाऱ्यांना धरले धारेवर 

कर्नाटक सरकारचे नवी दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील गटारी, स्वच्छ केल्यास संसर्गजन्य रोगराई थोपविणे शक्य आहे. चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 2022-23 सालासाठी डेस्क खरेदीसाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली तरी अद्याप डेस्क खरेदी झाली नाही, असे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article