प्रौढ लाभार्थींना बीसीजीची मोफत लस! डॉ. विजयकुमार वाघ : कवलापुरात लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
जिल्ह्यातील 2 लाख 7 हजार 722 पात्र लाभार्थ्यांनी बीसीजी लस दिली जाणार आहे. क्षयरोग मुक्त भारत अभियान अंतर्गत संमती दिलेल्या प्रौढ लाभार्थ्यांना बीसीजी लस मोफत दिली जाणार असून पात्र लाभार्थींनी लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी केले.
कवलापूर येथे राष्ट्रीय क्षयरोग मुक्त भारत अभियान अंतर्गत प्रौढ बीसीजी लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ मंगळवारी पार पडला. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. विवेक पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस बी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संप झाला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अतुल वाठारकर, सरपंच उज्वला गुंडे, बिसूरचे सरपंच सतीश निळकंठ, सांबरवाडीचे सरपंच प्रा. अशोक शिंदे, भानुदास पाटील, डॉ. संतोष राचोटकर, डॉ. बी एन शेळके उपस्थित होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वाघ म्हणाले, केंद्र शासनाचे सन 2025 पर्यंत भारत देश क्षयरोग मुक्त करण्याचे धोरण असून त्या दृष्टीने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत प्रा†तबंधात्मक विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. क्षयरोगापासून बचाव करण्यासाठी जन्मत: सर्व बालकांना बीसीजीची लस देण्यात येते. त्यामुळे बालकांना गंभीर प्रकारच्या क्षयरोगापासून बचाव होतो. बीसीजीची लस आता प्रौढांना देण्यात येणार असून सुरक्षित लस आहे.
मागील 5 वर्षापूर्वी औषधोपचार पूर्ण केलेले क्षयऊग्ण, 3 वर्षातील क्षयऊग्णांचे सहवा†सत, 18 पेक्षा कमी असणार्या व्यक्त, मधुमेही व्यक्त, धूम्रपान करणार्या व्यक्त तसेच सर्व 60 वर्षावरील व्यक्तींना लस दिली जाईल. जिह्यातील 3 लाख 63 हजार 119 पात्र लाभार्थ्यापैकी 2 लाख 7 हजार 722 लाभार्थ्यांनी संमती दिली आहे. याची टीबी-विन पोर्टलवर झाली आहे. ही लस् सर्व शासकीय दवाखान्यात मोफत उपलब्ध आहे. पात्र लाभार्थ्यांनी संमती देऊन लस घेऊन क्षयरोगापासून सुरा†क्षत व्हावे, असे आवाहन ा†जल्हा क्षयरोग आ†धकारी डॉ. वाघ यांनी केले.