महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बायजूविरुद्ध दिवाळखोरी कारवाईस बीसीसीआयला मंजुरी

06:53 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

कंपन्यांच्या प्रकरणांसंबंधी सुनावणी करणारे न्यायालय नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (एनसीएलटी)भारतातील सर्वात मोठी क्रिकेट संस्था बीसीसीआयला बायजूसविरुद्ध दिवाळखोरीची कारवाई करण्यासाठी परवानगी दिली आहे. बायजूसचे भारतीय क्रिकेट संघाकरीता बीसीसीआयसोबत स्पॉन्सरशिप (पुरस्कर्ता)साठी कंत्राट होते. बीसीसीआयने बायजुसने 158 कोटी रुपये बाकी रक्कम न

Advertisement

भरल्याचा आरोप केला होता. भारतीय संघाच्या जर्सीसंबंधात ही रक्कम भरायची होती.

मागच्या वर्षी बायजूसची सहकारी कंपनी थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडच्या विरुद्ध 158 कोटी न भरण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. यासंदर्भात पुढील सुनावणी 15 नोव्हेंबरला होणार होती. पण त्यावेळी बायजुसने दिवाळखोरीचे प्रकरण मिटवण्यासाठी बीसीसीआयशी चर्चा करणार असल्याचे म्हटले होते.  मंगळवारी यासंदर्भात सुनावणी झाली असून एनसीएलटीने त्यात इतर आर्थिक कर्जदार, एज्युटेकचे कर्मचारी आणि विक्रेते यांना बोलावलं आहे. कर्ज फेडण्यासंदर्भात कंपनीची चुक झाली असल्याचे एनसीएलटीने म्हटले आहे. बीसीसीआयची याचिका फेटाळून लावण्याचे कोणतेच कारण नसल्याचेही एनसीएलटीने स्पष्ट केले आहे.

दिवाळखोरीची कारवाई सुरु झाल्यास संस्थापक आणि सध्याचे संचालक बायजूसवरचे नियंत्रण गमावू शकतात. एकेकाळी बायजूसने ऑनलाइन शिक्षण व्यवसायात आपली जबरदस्त कामगिरी नोंदवली होती. कंपनीचे मूल्य 22 अब्ज डॉलरचे होते. कंपनीने खेळातील दिग्गज संस्था बीसीसीआय, इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सील आणि फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन यांच्यासोबत ब्रँडिंगकरीता भागीदारी केली होती. परंतु नंतरच्या काळात कंपनी कर्जाच्या खाईत  गेली आणि कायदेशीर कारवायांना कंपनीला सामोरे जावे लागले. बायजुसने बीसीसीआयसोबत 2019 मध्ये कंत्राट केले होते. याआधी ओप्पोकडे हे कंत्राट होते. 2022 मध्ये बीसीसीआयचे कंत्राटाची मुदत संपली आणि नंतर 2023 पर्यंत मुदत वाढवून मिळाली.

बीसीसीआयशी चर्चा अन् मार्ग

जानेवारी 2023 नंतर बायजूसला निधीच्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे लक्षात आल्यावर कंत्राट नूतनीकरण न करण्याचे घोषित केले. आता एनसीएलटीच्या सुनावणीनंतर बायजूसने आपण बीसीसीआयशी चर्चा करुन याप्रकरणी मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. बायजूसला निकालाविरुद्ध अपील करण्याचा पर्याय आहे. यावर स्टे आदेश मिळाल्यास दिवाळखोरीची कारवाई थांबू शकते, असे तज्ञांनी म्हटले आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#tarunbharatsindhudurg
Next Article