महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बीबीसी अध्यक्षपदी भारतवंशीय

07:00 AM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

समीर शाह यांच्याकडे मोठी जबाबदारी : सुनक सरकारचा निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था /लंडन

Advertisement

भारतीय वंशाचे समीर शाह हे ब्रिटिश प्रसारमाध्यम बीबीसीचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. ब्रिटनच्या ऋषी सुनक सरकारने यासंबंधी निर्णय घेतला आहे. मूळचे महाराष्ट्रातील औरंगाबादचे असलेले शाह हे सध्या जूनिपर कम्युनिकेशन्सचे सीईओ आहेत. शाह हे यापूर्वी बीबीसीच्या संचालक मंडळाचे सदस्य राहिले आहेत. बीबीसीत राजकीय आणि चालू घडामोडींशी निगडित प्रकरणांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शाह यांना टेलिव्हिजन क्षेत्रातील सेवेसाठी 2019 मध्ये महाराणी एलिझाबेथ यांनी सीबीई म्हणजेच कमांडर ऑफ मोस्ट एक्सिलेंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर अवॉर्डने गौरविले होते.

शाह हे बीबीसीमध्ये रिचर्ड शार्प यांची जागा घेणार आहेत. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासोबतचे संभाषण लीक झाल्याप्रकरणी चौकशी सुरू झाल्यावर शार्प यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. शाह यांच्यावर बीबीसीचे मिशन ‘इन्फॉर्म, एज्युकेट अँड एंटरटेन’ पूर्ण करण्याची जबाबदारी असणार आहे. याचबरोबर सरकारसोबत परवाना शुल्कावरून देखील शाह हेच चर्चा करणार आहेत. बीबीसीचे अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी यांना ब्रिटनच्या विविध खासदारांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागणार आहेत.

स्वत:चा अनुभव आणि कौशल्याद्वारे आगामी वर्षांमध्ये या संघटनेला आव्हानांवर मात करण्यास मदत करू शकलो तर माझ्यासाठी ही सन्मानाची बाब असणार आहे. बीबीसीचे ब्रिटनच्या नागरिकांच्या जीवनात एक महत्त्वाचे स्थान आहे. संघटनेवर देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचे कर्तव्य आहे. स्पर्धेच्या या काळात प्रत्येक कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शाह यांनी म्हटले आहे. समीर शाह हे 1952 साली औरंगाबाद येथे जन्मले होते. तर 1690 मध्ये त्यांचे कुटुंब इंग्लंडमध्ये स्थलांतरित झाले होते. समीर शाह यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले असून ते वांशिक विषयांशी संबंधित तज्ञ आहेत. 2021 मध्ये ते ब्रिनट सरकारच्या वांशिक आणि जातीय असमानता आयोगाच्या अहवालाचे ते सह-लेखक होते. बीबीसी ही स्वतंत्र संस्था असली तरीही याच्या अध्यक्षाची नियुक्ती सरकारकडून केली जाते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article