महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बावळाट- केसरी मुख्य मार्गावरील पुलाला पुरामुळे भगदाड

12:47 PM Jul 09, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

दोन दिवसापासून वाहतूक ठप्प ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या केसरी निवासस्थानाकडे जाणारा मुख्य रस्ता

Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या केसरी निवासस्थानाकडे जाणाऱ्या बावळाट- केसरी या मुख्यमार्गावरील पुलाला पुराच्या पाण्यामुळे भले मोठे भगदाड पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक गेल्या दोन दिवसांपासुन ठप्प आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे पालकमंत्र्यांचाच मार्ग बिकट बनल्याने प्रधानमंत्री ग्रामसडक खात्याने याची तात्काळ दखल घेऊन त्वरीत डागडूजी करावी आणि सार्वजनिक बांधकाम खात्यांच्या मंत्र्यासह या मार्गावरील वाहन चालकांसह ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी अशी मागणी या दोन्ही गावातून होत आहे.बावळाट गावचे ग्रामदैवत सातेरी माऊली मंदिरानजीक असलेला कमी उंचीचा पुल रविवारी सकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत पाण्याखाली होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक रविवार पासूनच ठप्प आहे. सोमवारी पुराचे पाणी ओसरल्यानंतर या पुलाला भगदाड पडल्याचे दृष्टीस आले. या पुलाला भगदाड पडल्यामुळे या दोन्ही गावातील वाहनचालकांसह ग्रामस्थ व शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे.वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मार्ग असून बांदा दाणोली या जिल्हा मार्गा दरम्यान बावळाट येथून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या केसरी येथील निवासाकडे जाण्यासाठी हा सर्वात जवळचा रस्ता आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण आपल्या निवासस्थानाकडून गोवा मोपा येथे विमानतळाकडे जाण्यासाठी ही याच मार्गाचा उपयोग करतात. त्यामुळे प्रधानमंत्री ग्रामसडक खात्याच्या अधिकारी वर्गाने याची तात्काळ दखल घ्यावी आणि पुल त्वरीत वाहतुकीस खुला करावा अशी मागणी या भागातून होत आहे.
आठ वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक खात्याअंतर्गत हा रस्ता कऱण्यात आला होता. त्यावेळी हा पूल बांधण्यात आला होता. सध्या या पुलासह जोड रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत सुमारे तीन कोटीचा निधी मंजूर आहे. लवकरच पावसाळ्यानंतर या कामात सुरुवात करण्यात येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news update # kesari # sawantwadi #
Next Article