कोल्हापूर- रत्नागिरी महामार्ग बंद ! वाढत्या पाण्यामुळे प्रशासनाचा निर्णय
प्रयाग चिखली वार्ताहर
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर केर्ली ते केर्ले दरम्यान पुराचे पाणी महामार्गावर वाढल्यामुळे पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक दुपारी दोन वाजले पासून पूर्णपणे बंद केली आहे.
पावसाचा जोर असल्यामुळे मंगळवारी सकाळीच या रस्त्यावर पुराचे पाणी पातळी पडली होती त्यानंतर काही काळ या महामार्गावरील पाण्यातून वाट काढत ये-जा करत होती. मात्र पाणी अर्धा फुटावर वाढले असून पाण्याचा वेग प्रचंड असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक दुपारी दोन वाजले पासून पोलिसांनी पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे या मार्गावरील अनेक वाहने खोळंबली आहेत.
दरम्यान वाहने केर्ली येथून ज्योतिबा दाणेवाडी वाघबीळ मार्गे प्रवास करून पुढे जात व येत आहेत. दरम्यान कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील आंबेवाडी रेडे डोह रजपूतवाडी चिखली फाटा या ठिकाणी रस्त्याच्या कडेला पाणी लागले आहे. आणखी एक दोन फूट पाणी वाढले तर कोल्हापूर रत्नागिरी संपूर्ण मार्गावरील वाहतूक बंद होणार आहे.