महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महाराष्ट्र पेटलेला असताना मकाऊमध्ये बावनकुळेंचा जुगार; संजय राऊतांचा गंभीर आरोप

05:56 PM Nov 20, 2023 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभिर आरोप करताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र पेटलेला असताना चंद्रशेखर बावनकुळे मकाऊमध्ये कॅसिनोत जुगार खेळत असल्याचे म्हटले आहे. संजय राऊतांनी बावनकुळेंना लक्ष्य करताना एक फोटोही ट्विट केला आहे.

Advertisement

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सद्या सुट्टीनिमित्त मकाऊला सहकुटुंब गेले आहेत. आज संजय राऊत यांनी आपल्य़ा सोशल अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करून त्यावर सवाल उपस्थित केला. ते म्हणाले आहेत कि, “एका बाजूला महाराष्ट्र पेटलेला आहे…आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झूम करुन पहा…ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है…” असे म्हटले आहे.
अधिक लिहिताना ते म्हणाले, “१९ नोव्हेंबर…मध्यरात्री…मुक्काम : मकाऊ, वेनेशाईन…साधारण ३. ५० कोटी कॅसिनो जुगारात उडवले..असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत…खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?” असा खोचक प्रश्न विचारताना त्यांनी बावनकुळे यांना कात्रीत पकडले आहे.

Advertisement

पुढे लिहिताना ते म्हणाले, “ ते म्हणे....कुटुंबासह मकाऊला गेले आहेत…जाऊ द्या. त्यांच्याबरोबर बसलेली फॅमिली चिनी आहे का ? ते म्हणे...कधीच जुगार खेळले नाहीत...मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का ? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल! झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय!,” असाही टोला त्यांनी लगावला आहे.

खासदार संजय राऊतांच्या या ट्विटनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आरोप करताना त्यांनी याची चौकशी केली पाहीजे असे म्हटले आहे. नाना पटोले म्हणाले, “ एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. दुसरीकडे, भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांचा फोटो समोर आला आहे. या फोटोचा तपासयंत्रणांनी तपास केला पाहिजे. याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कॅसिनोत जुगार खेळत असतील, तर ही महाराष्ट्रासाठी गंभीर बाब आहे. कॅसिनोमध्ये जुगार खेळण्यासाठी प्रदेशाध्यक्षांकडे एव्हढा पैसा आला कुठून ”असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement
Tags :
#bavankuleBavankule gambleMacau MaharashtraSerious accusation of Sanjay Rauttarun bharat news
Next Article