चेन्नई-हैदराबादमध्ये आज अस्तित्वाची लढाई
वृत्तसंस्था/चेन्नई
इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज शुक्रवारी होणाऱ्या अस्तित्वाच्या लढाईत चेन्नई सुपर किंग्सचा सामना तितक्याच उद्विग्न झालेल्या सनरायझर्स हैदराबादशी घरच्या मैदानावर होणार आहे. दोन्ही संघांची कामगिरी या हंगामात दोलायमान राहिली असून त्यांनी आठ सामन्यांतून फक्त 4 गुण मिळवले आहेत आणि आता त्यांच्या पात्रतेच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी उर्वरित सर्व सामने त्यांना जिंकावे लागतील. घरच्या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी ओळखले जाणारे पाच वेळचे विजेते चेन्नई सुपर किंग्स यावेळी चेपॉकमधील खेळपट्टी नीट ओळखू शकलेले नाहीत. त्यांनी त्यांच्या बालेकिल्ल्यात चांगली सुऊवात करताना मुंबई इंडियन्सवर वर्चस्व गाजवले. कारण नूर अहमदने पाहुण्या संघाभोवती जाळे विणले. परंतु सुऊवातीचे आश्वासक चित्र लवकरच धुळीस मिळाले. घरच्या मैदानावर सलग तीन पराभवांसह. कोलकाता नाईट रायडर्सविऊद्ध त्यांना आयपीएलमधील सर्वांत कमी धावसंख्येची (9 बाद 103) नामुष्कीही सहन करावी लागली.
मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीही चेपॉकच्या मैदानाबद्दल निराशा व्यक्त केली आहे, कारण नेहमीप्रमाणे चेन्नई सुपर किंग्सच्या फिरकी गोलंदाजांना मदत करण्यापेक्षा या मैदानाने वेगवान गोलंदाजांना जास्त संधी दिली आहे. त्यांच्या दूरस्थ ठिकाणांवरील कामगिरीतही फारसा चांगला बदल झालेला नसून चार प्रयत्नांत फक्त एक विजय त्यांनी मिळवला आहे. चेन्नई सुपर किंग्सकडे फलंदाजीत फायर पॉवरची कमतरता आहे आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे अनुपस्थित असल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. एम. एस. धोनी पूर्णवेळ कर्णधार म्हणून परतला आहे. त्याच्या गुडघ्याच्या समस्यांमुळे हालचालींवर मर्यादा आलेली असली, तरी या माजी भारतीय कर्णधाराचे नेतृत्व लाभणे अमूल्य आहे. त्याची शेवटची षटकांतील फलंदाजी तसेच क्षेत्ररक्षण रचना आणि गोलंदाजीत बदल करण्याची क्षमता सीएसकेच्या पुनऊज्जीवनात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. प्रोत्साहनदायक संकेतांमध्ये 17 वर्षीय आयुष म्हात्रेने मुंबईविऊद्ध आशादायक पदार्पण केले. संघाने त्यांचा पॉवर-हिटिंग विभाग मजबूत करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हिसलाही संघात घेतले आहे.
दुसरीकडे, हैदराबादचीही मोहीम तितकीच दोलयमान राहिली आहे. चमकदार सुऊवातीनंतर त्यांची घसरण झाली आहे. कारण त्यांची अतिआक्रमक रणनीती अपयशी ठरली आहे. गेल्या हंगामात अतिशय महत्त्वाची ठरलेली ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा ही स्फोटक सलामी जोडी या वर्षी त्याच उंचीवर पोहोचण्यात अपयशी ठरली आहे. शर्माच्या हुशारीने पंजाब किंग्सविऊद्ध विजय मिळाला, परंतु हेडला अद्याप खऱ्या अर्थाने आपला ठसा उमटवता आलेला नाही. पहिल्या दोन फलंदाजांवर जास्त अवलंबून राहिल्याने हैदराबादच्या मधल्या फळीचा कमकुवतपणा उघडकीस आला आहे. त्यांना दबाव पेलताना संघर्ष करावा लागलेला असून मुंबई इंडियन्सविऊद्ध सात गड्यांनी पराभूत झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनीही ते मान्य केलेले आहे.
सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), इशान किशन, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, सचिन बेबी, स्मरण रविचंद्रन, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, हर्षल पटेल, कामिंदू मेंडिस, विआन मुल्डर, अभिषेक शर्मा, नितीशकुमार रे•ाr, मोहम्मद शमी, राहुल चाहर, सिमरजित सिंग, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, एशान मलिंगा.
चेन्नई सुपर किंग्स : एम. एस. धोनी (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, डेव्हॉन कॉनवे, राहुल त्रिपाठी, शेख रशिद, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, आयुष म्हात्रे, रचिन रवींद्र, रविचंद्रन अश्विन, विजय शंकर, सॅम करन, अंशुल कंबोज, दीपक हुडा, जेमी ओव्हरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, खलील अहमद, नूर अहमद, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, श्रेयस गोपाल, मथीशा पाथिराना.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7:30 वा.