For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बॅटरींच्या किंमतींमध्ये 50 टक्क्यांची घट अपेक्षित

06:16 AM Nov 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
बॅटरींच्या किंमतींमध्ये 50 टक्क्यांची घट अपेक्षित
Advertisement

येत्या दोन वर्षांमध्ये ही स्थिती राहणार

Advertisement

नवी दिल्ली :

येत्या दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या म्हणजेच ईव्हीच्या किमती लक्षणीयरीत्या कमी होतील. 2026 पर्यंत, ईव्ही बॅटरीच्या किमती कमी राहण्याचा अंदाज आहे. ईव्ही उत्पादन खर्चाच्या 28-30 टक्के खर्च बॅटरीचा आहे. ग्लोडमॅन सॅच यांच्या अलीकडील अभ्यासानुसार, 2022 मध्ये जगभरात ईव्ही बॅटरीची सरासरी किंमत 153 डॉलर (सुमारे 13 हजार रुपये) प्रति किलोवॅट होती.

Advertisement

2023 मध्ये त्याची किंमत 149 डॉलर (सुमारे 12,500 रुपये) होती, जी 2026 पर्यंत, किंमत 80 डॉलर (सुमारे 6,700 रुपये) प्रति किलोवॅटपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे. 2022 च्या तुलनेत ही जवळपास 50 टक्के कमी आहे. बॅटरीच्या किंमती या पातळीवर आल्यानंतर, इलेक्ट्रिक कारची किंमत पेट्रोल कारइतकीच राहणार असल्याची माहिती आहे.

इलेक्ट्रीक वाहनांना मिळणार वाव

देशातील ईव्हींना वाव देण्यासाठी बॅटरी आणि चार्जिंग सेवांवरील जीएसटी कमी करणे आवश्यक आहे. तसेच, ईव्ही विक्री वाढवण्यासाठी पीएम ई-ड्राइव्ह फंड वाढवण्याची गरज आहे. एफआयसीसीआयने आपल्या राष्ट्रीय परिषदेत ही मागणी सरकारसमोर ठेवली.

एफआयसीसीआय इलेक्ट्रिक व्हेईकल कमिटीच्या अध्यक्षा सुलभा फिरोदिया मोटवानी यांनी सांगितले की, ईव्ही बॅटरी आणि चार्जिंग सेवांवर 18 टक्के जीएसटी आहे. आम्ही तो 5 टक्केपर्यंत कमी करण्याची विनंती करतो. जेणेकरून बॅटरी, चार्जिंग ग्राहकांना परवडू शकेल.

पंतप्रधानांचे सल्लागार तरुण कपूर म्हणाले- नवीन इलेक्ट्रिक कार आणण्यासाठी ऑटोमोटिव्ह उद्योगाला मोठी भूमिका बजावण्याची गरज आहे. सरकार कर मुद्यांसह सर्व बाबींचा विचार करेल. जेव्हापासून आधुनिक इलेक्ट्रिक कार बाजारात आल्या आहेत, तेव्हापासून बॅटरीच्या किमती सातत्याने घसरत आहेत.

घट होण्याची कारणे

  1. प्रगत तंत्रज्ञान: अभ्यासात गुंतलेल्या विश्लेषकांच्या मते, सेल-टू-पॅक तंत्रज्ञानासाठी कमी बॅटरी मॉड्यूलची आवश्यकता असते.
  2. कच्च्या मालाची कमी किंमत: लिथियम, कोबाल्ट सारख्या कच्च्या मालाचा वापर बॅटरी उत्पादनात केला जातो. 2022 पर्यंत हे महाग होते. मग घसरण सुरूच राहते. ही घसरण 2030 पर्यंत कायम राहू शकते. यामुळे, बॅटरी उत्पादन खर्च सुमारे 40 टक्के कमी होईल.
Advertisement
Tags :

.