क्षेत्र प्रयाग येथील स्नानपर्वास आजपासून प्रारंभ
२६ फेब्रुवारी पर्यंत चालू राहणार स्नान पर्वकाळ
पर्वकाळ दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन
प्रयाग चिखली
करवीर काशी- दक्षिण काशी श्री क्षेत्र प्रयाग येथील पंचगंगेच्या मूळ संगमावरील स्नान पर्वकाळ मंगळवार दि. १४रोजी सकाळी ८ वा. ४५ मिनिटापासून सुरु होणार आहे. करवीर नगरीत महालक्ष्मीचे वास्तव्य असल्यामुळे भुक्ती व मुक्तीचे दान प्रयास्नान या उक्तीप्रमाणे या ठिकाणी स्नान व दर्शन घेतल्याने पुण्य व सुखप्राप्ती आणि मुक्ती ही मिळते अशी भाविकांची भावना असल्यामुळे येथील स्नान व दर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरवर्षीप्रमाणेच मकर संक्रातीच्या योगावर सूर्य मकर राशीत प्रवेश करताना संगमावरील स्नानासाठीचा स्नान पुण्य पर्वकाळ सुरू होणार असला तरी चालू वर्षी मात्र महा कुंभमेळ्याचा योग आला आहे. शेकडो वर्षानंतर आलेल्या या योगावर उत्तर प्रदेशातील प्रयागराज ठिकाणी महा कुंभमेळा संपन्न होत आहे. त्याच्याच संदर्भाने क्षेत्र प्रयाग या ठिकाणीही महाकुंभमेळ्याचे पुण्य मिळावे या अनुषंगाने करवीर काशी ग्रंथांमध्ये उल्लेख आलेल्या दक्षिण काशी असलेल्या क्षेत्र प्रयाग येथे भाविकांना स्नान व व दर्शनाचा लाभ होणार त्याच लाभ घ्यावा असे आवाहन येथील पुजारी ऋषिकेश गिरी गोसावी यांनी केलेले आहे.
सालाबाद प्रमाणे सूर्य मकर राशीत प्रवेश करताना मंगळवारी सकाळी 8 वाजून 54 मिनिटापासून या ठिकाणी स्नाना साठीचा महापुण्यपर्वकाळ सुरू होणार आहे. यावेळी येथील दत्तात्रयांची मूर्ती येथील संगमावर स्नानासाठी जाणार आहे. यावेळी भाविक भक्त दत्तमूर्ती स्नान घालणार आहेत तेथून पालखीतून वाजत गाजत सर्व देवतांच्या स्थानांना भेट देत पुन्हा येतील दत्त मंदिरामध्ये पालखी येणार आहे. त्यानंतर आरती बरोबरच विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
मंगळवारी सुरू झालेला हा स्नान पर्वकाळ पुढे दीड महिना म्हणजे 26 फेब्रुवारी पर्यंत चालू राहणार असून या काळात या ठिकाणी मोठी यात्रा भरणार आहे. यात्रा काळात या ठिकाणी दररोज विविध धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रम भजन प्रवचन आरती दत्तयाग गुरुचरित्र वाचन, होम हवन यज्ञाचे आयोजन महाप्रसाद असे भरगच्च अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या स्नान पर्व काळाचा व विविध अध्यात्मिक उपक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन येथील पुजारी ऋषिकेश गिरी गोसावी यांनी केला आहे.
प्रयाग ठिकाणी भाविकांना ठिकाणी सुविधा मिळाव्यात
महा कुंभमेळ्याच्या अनुषंगाने प्रयागराज येथे प्रशासन हजारो कोटी रुपये खर्च करून येणारा भाविकांना अनेक विविध सुविधा पुरवते त्या दृष्टीने क्षेत्र प्रयाग ग येथेही भाविकांची गर्दी होणार आहे त्या दृष्टीने सुलभ शौचालय सोयीनियुक्त स्नानगृह, पार्किंगची योग्य सोय, बसायची बाकडी, रात्रीच्या काळात योग्य लाईटची सोय, घाटावरती जीव रक्षकांची उपलब्धता, स्वच्छता कुंड, तक्रार निवारण- मदत केंद्र, अशा सुविधा प्रशासनाकडून पुरवाव्यात अशी भाविकातून व पर्यटकातून मागणी आहे.