महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बस्तवाड ग्रा. पं. उपाध्यक्षावर कोंडसकोप गावात हल्ला

12:41 PM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : ग्राम पंचायत उपाध्यक्षावर हल्ला करण्यात आला आहे. कोंडसकोप, ता. बेळगाव येथे गुरुवारी ही घटना घडली असून यासंबंधी पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता. बस्तवाड ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष विठ्ठल सांबरेकर (वय 40) रा. कोंडसकोप असे जखमीचे नाव आहे. त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. यासंबंधी पुंडलिक यल्लाप्पा कुडचीकर, नागराज बाबू वाळके, विजय राजू सनदी, भीमा बाळाप्पा देमण्णावर, मोनाप्पा यल्लाप्पा कुडचीकर सर्व रा. कोंडसकोप या पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच हिरेबागेवाडीचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. हल्लाप्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. कलमेश्वरनगर परिसरात सुरू असलेल्या बांधकामासंबंधी तलाठ्यांना कागदपत्रे दाखविताना उपाध्यक्षावर दगडाने हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article