महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करणार

03:04 PM Dec 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डॉ. चंद्रकांत शेट्यो, भटवाडी - नानोडा आणि कासारपाल येथे रस्ताकामाची पायाभरणी

Advertisement

वार्ताहर/लाटंबार्से

Advertisement

डिचोली मतदारसंघातील प्रत्येक गावात रस्ते आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द आहे, अशी ग्वाही आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी दिली. लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील प्रभाग-7 आणि कासरपाल येथील प्रभाग-5 च्या रस्ता कामाच्या पायाभरणीप्रसंगी डॉ. चंद्रकांत शेट्यो बोलत होते. विकासासाठी जनतेचे सहकार्य महत्त्वाचे असून कोणतेही मतभेद न ठेवता विकासासाठी जनतेने पुढे यावे, असे आवाहनही आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे हे रस्ते बांधण्यात येणार आहे. यावेळी साहाय्यक अभियंता रश्मी मयेकर, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच पद्माकर मलिक, पंच पूजा घाडी, नरेश गावस, पुरोहित बांदेकर, शाम हरमलकर, श्री. परमेकर, माजी सरपंच, सदस्य आदी उपस्थित होते. मुळगाव पंचायत क्षेत्रातील शिरोडवाडी प्रभाग 6 येथे पेव्हर्स बसविण्यात येणार आहे. या कामाचा आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी मुळगावच्या सरपंच तृप्ती गाड, उपसरपंच गजानन मांद्रेकर, पंच मानसी कवठणकर, सुहासिनी गोवेकर यांच्यासह साहाय्यक अभियंता रश्मी मयेकर आदी उपस्थित होते. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article