महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सेंट्राकेअरमध्ये बॅरिएट्रिक सर्जरी यशस्वी

09:56 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपक्रम : आरोग्यमय जीवन जगण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे

Advertisement

बेळगाव : येथील सेंट्राकेअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया (बेरिअॅट्रिक सर्जरी) यशस्वीपणे करण्यात आली आहे. स्थूलपणा किंवा वजन वाढल्याने अनेक आजार होतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, यकृताच्या आजारांना निमंत्रण मिळते. शिवाय दीर्घकाळ असणाऱ्या स्थूलपणामुळे विविध प्रकारचे कर्करोग होऊ शकतात. त्यामुळे आरोग्यमय जीवन जगण्यासाठी आपले वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.

Advertisement

वजन कमी करण्यासाठी असलेले उपचार सर्वांना जमतील, असे नाही. त्यासाठी वैयक्तिक समस्यांचा विचार करावा लागतो. वजन कमी करण्याचे लक्ष्य अंगातील चरबी, विविध आजार. जसे मधुमेह, हृदयविकार, निद्रानाश, मानसिक आरोग्य, गुडघेदुखी आदी कारणांमुळे वजन कमी करण्यासाठी पर्याय शोधावे लागतात. त्यापैकी सर्वाधिक उत्तम आणि कमी धोक्याचा पर्याय म्हणून बेरिअॅट्रिक सर्जरी हा उत्तम उपाय आहे.

स्थूलपणा शरीरातील चरबीवर अवलंबून असतो. चरबीचे प्रमाण मोजण्यासाठी बॉडी मास इंडेक्सचा (बीएमआय) वापर केला जातो. बीएमआय 35 असेल तर स्थूलपणा वाढतो. तो लवकरच कमी होत नाही. अशा व्यक्तींना मधुमेह, श्वास घेण्यास त्रास होणे, गुडघेदुखी, निद्रानाश, नैराश्य व चपळता कमी होणे असा त्रास संभवतो. अशा व्यक्तींसाठी बेरिअॅट्रिक सर्जरीद्वारे 20 ते 40 किलोपर्यंत वजन कमी करता येणे शक्य आहे.

सेंट्राकेअर येथे तज्ञांकडून शरीरात कोणतीही गुंतागुंत होणार नाही, याची काळजी घेऊन सर्जरी केली जाते. सर्जरीच्या दुसऱ्याच दिवशी व्यक्तीला सहजपणे हालचाल करता येऊ शकते. लॅप्रोस्कोपिक तंत्रामुळे हे शक्य असून तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज दिला जातो. सेंट्राकेअरच्या व्यवस्थापकीय संचालक व नामांकित बेरिअॅट्रिक फिजिशियन डॉ. नीता देशपांडे यांनी नव्या पद्धतीची शस्त्रक्रिया बेळगावमध्ये उपलब्ध करून दिली आहे. या क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ अनुभवाचा फायदा रुग्णांना होतो.

पुणे येथील लॅप्रोस्कोपिक ओबेसिटी सेंटरचे डॉ. शशांक शाह, डॉ. सुशील खरात व सल्लागार राधिका शाह यांनी सेंट्राकेअरमधील ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. तत्पूर्वी हॉस्पिटलमधील सुविधा, रुग्णांनी घ्यायची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. सदर रुग्णांनी या शस्त्रक्रियेमुळे आपल्याला खूप लाभ झाल्याचे सांगितले. सेंट्राकेअरने आतापर्यंत विविध प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. वैयक्तिक उपचारासाठी अनुभवी डॉक्टर येथे कार्यरत आहेत. या हॉस्पिटलमध्ये आधुनिक उपचार पद्धतीने रुग्णाचे जीवन सुखकर होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून अधिक प्रभावी उपचार पद्धत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article