बार असोसिएशनच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
12:39 PM Jul 29, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : बेळगाव बार असोसिएशनची सर्वसाधारण सभा सोमवार दि. 28 रोजी दुपारी जुने बार असोसिएशन हॉल (टीव्ही हॉल) जिल्हा न्यायालय कॉम्प्लेक्समध्ये पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एस. एस. किवडसण्णावर होते. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी बेळगाव बार असोसिएशनच्या लेखा आणि लेखा परीक्षण विवरण पत्रावर चर्चा करून त्याला मंजुरी देण्यात आली. बैठकीत सर्वोच्च न्यायालयाने विशेष अपिल क्रमांक (सी) 1404/2025 मध्ये दिलेल्या आदेशानुसार सुधारित उपकायद्याच्या मसुद्यावर त्याचबरोबर इतर विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष ॲड. बसवराज मुगळी, ॲड. शीतल रामशेट्टी, जनरल सेक्रेटरी ॲड. यल्लाप्पा दिवटे, सहसचिव ॲड. विश्वनाथ सुलतानपुरी यांच्यासह पदाधिकारी व वकील उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article