बॅंकेच्या वसुली अधिकाऱ्यांना बेदम मारहाण..
कोल्हापूरः
कोल्हापूरात एका बॅंकेच्या वसुली अधिकाऱ्याला बेदम मारहाण झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ बघता बघता व्हायरल झाला. हुपरी येथील आप्पासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.
या सहकारी बॅंकेचे वसुली अधिकारी कर्जासाठी तारण ठेवलेल्या मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी आले होते. दरम्यान संबधित अधिकाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. बँकेच्या अधिकाऱ्यांना अमानुष मारहाण करत पिटाळून लावले.
दिड वर्षांपूर्वीचा हा व्हिडीओ बॅंकेतर्फे नाही, तर स्वतः कर्जदाराने व्हायरल केला आहे. ३१ मार्चअखेर सर्व बॅंकेचे वसुली पथक कर्ज वसुलीसाठी जात असतात. अशातच या कर्जदाराला नोटीस पाठविली गेली. तेव्हा त्याने हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल केला जेणेकरून बॅंक अधिकारी घाबरुन जातील आणि कर्जवसुलीसाठी येणार नाहीत.
या कर्ज वसुलीसाठी तारण मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी बॅंकेने जिल्हाधिकाऱ्यांची संमत्ती ही घेतली होती. त्यामुळे अशा कर्जदारास धडा शिकवण्यासाठी आणि बॅंकेचे थकित कर्ज मालमत्ता ताब्यात घेऊन वसूल करण्यासाठी कोल्हापूर नागरी बॅंक असोसिएशन, पतसंस्था फेडरेशन आणि वसुली अधिकारी संघ यांनी कंबर कसली आहे. या तिन्ही संघटना एकत्र येऊन या कर्जदारावर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती किरण कल्याण यांनी दिली.
हे नेमकं काय प्रकरण आहे ?
हुपरी येथील आप्पासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँकेने ६० लाख रुपयांचे कर्ज एका कारखान्याला दिले होते. या कर्जाची काहीही परतफेड या कर्जदाराने केली नसल्याने हे कर्ज एक कोटी ३० लाखांपर्यंत पोहोचले आहे. अशात बॅंकेचे कर्मचाऱी , कर्ज तारण ठेवलेल्या मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी तिथे पोहोचले असताना कर्जदाराने अधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली. हे प्रकरण दिड वर्षांपूर्वीचा आहे. तेव्हा बॅंकेने समझोता केला आणि कर्ज परतफेढ होईल अशी आशा ठेवली. पण दिड वर्षात कर्जखात्याला काहीही रक्कम जमा न झाल्याने बॅंकेने ३१ मार्च च्या आधी कर्जवसुली करण्यासाठी पुन्ही नोटीस पाठविली. असे असताना बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना भिती घालण्यासाठी हा कर्जदाराने तो व्हिडीओ पुन्हा व्हायरल केला आहे. जेणेकरून या व्हिडीओची भिती राखून बॅंक अधिकारी वसुलीसाठी येऊच नयेत.