महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बँक मॅनेजरकडून खातेदारांची 96 लाखांची फसवणूक

11:30 AM Jan 29, 2025 IST | Radhika Patil
featuredImage featuredImage
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

आयसीआयसीआय बँकेच्या शहरातील मंगळवार पेठ आणि पुलाची शिराली औद्योगिक वसाहतीमधील शाखा मॅनेजरने बँकेच्या बारा खातेदारांना त्यांच्या बँक खात्यावरील रक्कम फिक्स डिपॉझीट अकौंटमध्ये ट्रान्स्फर करतो. तसेच मॅच्युअल फंडामध्ये गुंतवितो, असे सांगून 96 लाख 60 हजार 18 रूपयाचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने, बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Advertisement

 पोलिसांनी गुन्हा दाखल होताच ठकसेन बॅंक मॅनेजर विकास आण्णाप्पा माळी (वय 38, रा. केंपवाड, ता. अथणी, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक, सध्या रा. स्वामी समर्थनगर, जरगनगर, कोल्हापूर) त्याला तत्काळ अटक केली. पोलिसांनी त्याला मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याला पोलीस कोठडी सुनावली. त्याच्या विरोधी बँकेचे खातेदार गजानन सदाशिव गायकवाड (़वय 44, रा. महालक्ष्मी संकुल, कुपवाड रोड, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे, अशी माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी दिली.

पोलीस निरीक्षक झाडे म्हणाले, संशयीत ठकसेन बँक मॅनेजर विकास माळी हा शहरातील मंगळवार पेठेतील आणि पुलाची शिराली औद्योगिक वसाहतीमधील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत मॅनेजर म्हणून नोकरी करीत असून, त्याने बँकेचे बारा खातेदारांना त्यांची रक्कम फिक्स डिपॉझीट अकौंटमध्ये व मॅच्युअल फंडामध्ये आणि इतर ठिकाणी गुंतवणूक करतो, असे सांगितले. या बारा खातेदारांच्या बँक खात्यावऊन त्याने 96 लाख 60 हजार 18 रूपये इतकी रक्कम ओळखीचे अधवूत रमेश पाटील, त्यांची पत्नी शिवानी अवधूत पाटील, सुधीर मारूती शिरगुप्पे व भाऊसाहेब बबनराव सावंत या चार जणांच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावर ट्रान्स्फर करून घेतली. ही ट्रान्स्फर रक्कम त्याने अथणी (जि. बेळगांव) येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील आपल्या बँक खात्यावर ट्रान्स्फर कऊन घेतली. तेथून त्याने ही रक्कम त्याच्या झेरोदा ब्रोकींग लि. या कंपनीच्या ट्रेडींग अकौंट नंबर एसझेडआर 940 यामध्ये ट्रान्सफर करून घेवून, या लाखो ऊपयांच्या रक्कमेचा अपहार करून, आयसीआयसीआय बँकेच्या बारा खातेदारांची 96 लाख 60 हजार 18 रूपयाची फसवणूक केली आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या ठकसेन मॅनेजर विकास माळी यांनी ज्या 12 बँक खातेदारांना गंडा घातला आहे. त्यामध्ये स्नेहा भोसले (रा. कोल्हापूर) यांना 17 लाख 50 हजार रूपये, श्रध्दा भोसले (रा. कोल्हापूर) यांना 5 लाख रूपये, तेजोमय हॉस्पीटल डॉ. महेश दळवी यांना 48 लाख रूपये, मानवेंद्रनाथ जोशी (रा. कोल्हापूर) यांना 7 लाख 50 हजार रूपये, प्रकाश जगदाळे (रा. कोल्हापूर) यांना 5 लाख रूपये, आरती भावे (रा. कोल्हापूर) यांना 4 लाख रूपये, रवि गुडस ट्रान्स्फोर्ट प्रोप्रा रविंद्र भावे यांना 1 लाख 50 हजार रूपये, उध्दव इंगळे (रा. कोल्हापूर) यांना 3 लाख 10 हजार 18 रूपये, गजानन सावंत (रा. कोल्हापूर) यांना 1 लाख रूपये, विशाल सोनावणे (रा. कोल्हापूर) यांना 1 लाख रूपये, संतोष पठारे (रा. कोल्हापूर) यांना 50 हजार रूपये, न्युमॅटिक सेल्स अॅन्ड सर्व्हिसेस प्रोप्रा नितीन शिंदे यांना 2 लाख 50 हजार रूपयांना गंडा घातला.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia