For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेंडुलकर कुटुंब नृसिंहवाडी येथे दत्ताच्या दर्शनाला

03:43 PM Feb 19, 2025 IST | Pooja Marathe
तेंडुलकर कुटुंब नृसिंहवाडी येथे दत्ताच्या दर्शनाला
Advertisement

कोल्हापूर
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे क्रिकेटपट्ट सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबीयांनी श्री दत्त दर्शन घेतले. यावेळी पत्नी अंजली तेंडुलकर, मुलगी सारा तेंडुलकर तसेच अर्जुन तेंडुलकर यांनी श्री दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले.

Advertisement

आज सकाळी मुंबईहून विमानाने कोल्हापुरात आले होते. यावेळी कोल्हापुरात विविध ठिकाणी भेट देऊन, नृसिंहवाडी इथल्या श्री दत्त मंदिरात अंजली तेंडुलकर सारा तेंडुलकर तसेच अर्जुन तेंडुलकर आले होते. यावेळी लोकांनी गर्दी केली होती. दरम्यान श्री दत्त महाराजांचे चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. यावेळी मंदिराचे पुजाऱ्यांनी दत्त महाराजांची प्रतिमा देऊन आशीर्वाद दिला. त्यानंतर येथील टेंबे स्वामी मठात जाऊन ही दर्शन घेतले त्यानंतर कोल्हापूरकडे प्रयाण झाले.

Advertisement
Advertisement
Tags :

.