साताऱ्यातील तरुणांचे बँक अकाऊंट लॉक
सातारा :
तुमच्या खात्यात पाकिस्तानातून पैसे आले आहेत, असली कारणं सांगून साताऱ्यातील कित्येक व्यवसायिक तरुणांची बँक अकाऊंट लॉक करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, नॅशनलाईज बँकेच्या अधिकाऱ्यांनी हात वर करुन पोलिसांकडे निर्देश केले आहेत. तर सातारा पोलिसांनी या साऱ्या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले आहे.
शहरातील कित्येक तरुणांचे नॅशनल बँकेतील अकाऊंट लॉक झाल्याने एकच खळबळ उडाली होती. संबंधित तरुणांनी बँकेशी संपर्क साधला असता बँकेने पोलिसांनी सांगितल्याने त्यांच्याच आदेशाने अकाऊंट लॉक केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तरुण व्यवसायिकांनी पोलिसांशी संपर्क केला असता पोलिसांनी याबाबत सातारा पोलिसांना काहीच कल्पना नसल्याचे स्पष्ट केले.
हा वाद जास्तच वाढत गेल्याने शहरात गोंधळ वाढत गेला. अखेर तरुणांनी अकाऊंट लॉक करण्याच्या सूचना या पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश अशा पोलिसांनी दिल्याचे सांगण्यात आले. पोलिसांकडून आलेल्या मेलचा पाठपुरावा करुन तरुणांनी त्या-त्या राज्यातील पोलिसांशी प्रत्यक्ष फोन करुन संवाद साधला असता तुमच्या खात्यात जमा झालेली रक्कम ही थेट पाकिस्तानमधून किंवा पाकिस्तानशी संबंधित कनेक्शनमधून जमा झाली असल्याचे सांगण्यात आले.
वास्तविक सातारा शहरातील अकाऊंट लॉक झालेल्या तऊणांमध्ये कोणत्याही जाती किंवा धर्माचे तसेच एकाच कंपनी किंवा सेक्टरचे साधर्म्य नाही. शेकडो तऊणांची बँक खाती अचानक लॉक झाल्याने शहरात जोरदार चर्चा आहे. तर याबाबत माहिती सांगण्यास सातारा शहर पोलीस हे असमर्थ आहेत.
- मुर्ख बँक मॅनेजरमुळे गोंधळ वाढला
शहरातील मुथा चौक परिसरातील एका बँक शाखेत हा प्रकार प्रामुख्याने घडला आहे. याबाबत तऊणांनी विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता संबंधित शाखेच्या व्यवस्थापकाने प्रचंड वादग्रस्त विधाने केल्याने गोंधळ अधिकच वाढल्याचे समजते. त्यामुळे ‘त्या’ अधिकाऱ्याची शहर पोलिसांनी कडक चौकशी करावी, अशी काही तऊणांनी ‘तऊण भारत’कडे मागणी केली आहे.