For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेशचा झिंबाब्वेवर सलग तिसरा विजय

06:45 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेशचा झिंबाब्वेवर सलग तिसरा विजय
Advertisement

सामनावीर तौहिद हृदॉय : 38 चेंडूत 57

Advertisement

वृत्तसंस्था/ चेतोग्राम

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान बांगलादेशने झिंबाब्वेवर 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील मंगळवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने झिंबाब्वेचा 9 धावांनी पराभव केला. बांगलादेशच्या हृदॉयला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 165 धावा जमविल्या. त्यानंतर झिंबाब्वेने 20 षटकात 9 बाद 156 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला. बांगलादेशच्या डावामध्ये हृदॉयने 38 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 57, जाकर अल्लीने 34 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 44, टी. हसनने 22 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 21, लिटन दासने 15 चेंडूत 2 चौकारांसह 12 धावा जमविल्या. हृदॉय आणि जाकर अल्ली यांनी चौथ्या गड्यासाठी 9.3 षटकात 87 धावांची भागिदारी केली. बांगलादेशच्या डावात 5 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. झिंबाब्वेतर्फे मुझारबन्नीने 14 धावात 3 तर अकरम आणि सिकंदर रझा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. बांगलादेशने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 42 धावा जमविताना 2 गडी गमविले. बांगलादेशचे अर्धशतक 44 चेंडूत, शतक 84 चेंडूत तर दीड शतक 116 चेंडूत फलकावर लागले. हृदॉयने अर्धशतक 2 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 34 चेंडूत झळकविले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना झिंबाब्वेच्या डावात फराज अक्रमने 19 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारसह नाबाद 34, मुझारबानेने 4 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 9, मरूमणीने 26 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 31, कॅम्पबेलने 10 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 21, मासाकेझाने 1 चौकारांसह 13 आणि क्लाईव्ह मॅडन्डेने 1 चौकारांसह 11 धावा केल्या. झिंबाब्वेच्या डावात 5 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. झिंबाब्वेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 33 धावा जमविताना 3 गडी गमविले. झिंबाब्वेचे अर्धशतक 49 चेंडूत, शतक 89 चेंडूत तर दीडशतक 117 चेंडूत फलकावर लागले. बांगलादेशतर्फे सैफुद्दीनने 42 धावात 3, रिशाद हुसेनने 38 धावात 2, टी. इस्लाम, टी. अहमद, शकीब, मेहमुदुल्ला यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : बांगलादेश 20 षटकात 5 बाद 165 (हृदॉय 57, जाकरअल्ली 44, टी.हसन 21, दास 12, अवांतर 10, मुझारबानी 3-14, अक्रम, सिकंदर रझा प्रत्येकी 1 बळी), झिंबाब्वे 20 षटकात 9 बाद 156 (फराझ अक्रम नाबाद 34, मरूमणी 31, कॅम्पबेल 21, मासाकेझा 13, अवांतर 9, सैफुद्दिन 3-42, रिशाद हुसेन 2-38, टी. इस्लाम, टी. अहमद, शकीब, मेहमुदुल्ला प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.