For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांगलीत बांगलादेशी घुसखोरास अटक

05:24 PM Mar 17, 2025 IST | Radhika Patil
सांगलीत बांगलादेशी घुसखोरास अटक
Advertisement

सांगली :

Advertisement

कायदेशीर परवानाशिवाय भारतात घुसखोरी करत सांगलीत वावरणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला सांगली शहर पोलिसांनी अटक केली. अमीर शेख या नावाने बनावट कागदपत्रे तयार केले असून त्याचे मूळ नाव अमीर हुसेन असे त्याच संशयिताचे नाव आहे. बनावट कागदपत्राच्या आधारे तो शहरातील एका लॉजवर वास्तवास असल्याचे तपासात समोर आले. शहर पोलिसांच्या सतर्कतेने ही कारवाई करण्यात आली.

शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. याबाबत अधिक माहिती अशी की, शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथक शहरात गस्तीवर होते. सकाळी पथकाला शहरातील पटेल चौक ते आमराई रस्त्यावर एकजण संशयितरीत्या मिळून आला. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अमीर शेख (रा. दिल्ली) असे सांगितले. शेख याने आधार कार्डही दाखवले त्यावर एबीसी नजदीक आंबेडकर चौक, मुनरीका गाव जेएनयू दक्षिण-पश्चिम दिल्ली असा पत्ता होता. परंतु त्याच्या बोलण्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. अखेर शेख या नही तो बांगलादेशातील ढाका येथील असल्याचे कबूल केले.

Advertisement

दरम्यान, पोलिसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेतला असून त्यातील कागदपत्रांच्या फोटोवरून तो बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले. बेकायदेशीर रित्या कोणत्याही अधिकृत कागदपत्रा शिवाय भारतात घुसखोरी केल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्यावर सांगली शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.

  • संशयिताची कसून चौकशी सुरू

सांगलीत बांगलादेशी नागरिक असल्याचे समोर आले. त्यानुसार कारवाई करण्यात आली. याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. हा विमानाने कोलकत्ता येथे आला. तेथून पुण्यात आला. बसमधून तो सांगलीत येवून एका लॉजवर राहत होता. त्याचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये तेथील भाषेचा वापर व ८८० आय एस डी कोड असलेले मोबाईल व लैंड लाईन नंबर पोलिसांना आढळून आले आहेत, अशी माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.

Advertisement
Tags :

.