महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बांगलादेशी घुसखोरास म्हापशात अटक

11:35 AM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

म्हापसा : भारतात घुसखोरी करून अवैधरित्या म्हापसा शहरात फिरणाऱ्या बांगलादेशी युवकास कर्तव्यदक्ष पोलिसांनी अटक केली. मोहम्मद जहांगी मोंडल ऊर्फ जहांगीर मोंडल (24) असे संशयिताचे नाव आहे. भारत-बांगलादेश सीमेवरील शेतांमधील पायवाटा तुडवत तो देशात आला व तेथून रेल्वेमार्गे गोव्यात दाखल झाला, असे पोलीस तपासात समोर आले आहे. तो वैध कागदपत्रांविना ओळख लपवत छुप्या मार्गाने भारत-बांगलादेश सीमेवरून देशात येऊन म्हापसा परिसरातील रस्त्यावर फिरत असताना बिट पेट्रोलिंग करणारे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक दिनेशकुमार मुखिया, हेड कॉन्स्टेबल सुशांत चोपडेकर व तुकाराम शिरोडकर यांनी या संशयितास शिताफीने ताब्यात घेत नंतर त्यास रितसर अटक केली. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयिताविरोधात विदेशी कायदा व पासपोर्ट प्रवेश कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सीताकांत नायक, तसेच उपनिरीक्षक दिनेशकुमार मुखिया, उपनिरीक्षक गौरव नाईक, हवालदार सुशांत चोपडेकर यांनी ही कारवाई केली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article