महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘कडक सिंह’मधून बांगलादेशी अभिनेत्रीचे पदार्पण

06:46 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंकज त्रिपाठीसोबत जमली जोडी

Advertisement

अभिनेता पंकज त्रिपाठी लवकरच ‘कडक सिंह’ या चित्रपटात दिसून येणार आहे. अनिरुद्ध रॉय चौधरी यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटाद्वारे एक बांगलादेशी अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या अभिनेत्रीचे नाव जया अहसान आहे. जया ही बांगला चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आहे.

Advertisement

जयाने मॉडेल म्हणून स्वत:च्या कारकीर्दीस सुरुवात केली होती. तिने आतापर्यंत 100 हून अधिक बांगलादेशी चित्रपट, टीव्ही शो आणि वेब शोंमध्ये काम केले आहे. अलिकडेच ‘कडक सिंह’ या चित्रपटाचे आयएफएफआयमध्ये प्रदर्शन करण्यात आले होते, जेथे प्रेक्षकांकडून स्टँडिंग ओवेशन मिळाले होते.

स्वत:च्या कामामुळे मला 32 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. परंतु इफ्पीचा अनुभव माझ्यासाठी मैलाचा दगड आहे. स्वत:च्या बॉलिवूड पदार्पणावरून मी अत्यंत उत्सुक आहे. हा माझा पहिला हिंदी चित्रपट असल्याचे जयाने म्हटले आहे.

अभिनेत्री असण्यासोबत जया ही प्रशिक्षित क्लासिकल सिंगर देखील आहे. ती रविंद्र संगीतात डिप्लोमाधारक आहे. कडक सिंह हा चित्रपट स्वत:च्या मुलीचा विसर पडलेल्या एका पित्याची कहाणी दर्शविणारा आहे. हा चित्रपट 8 डिसेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 वर प्रदर्शित होणार आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article