For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेश महिला संघाची घोषणा

06:29 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेश महिला संघाची घोषणा
Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

Advertisement

आगामी होणाऱ्या महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी बांगलादेश संघाची घोषणा करण्यात आली. या संघामध्ये अनुभवी रुमाना अहमद आणि जहाआरा आलम यांचे पुनरागमन झाले आहे.

बांगलादेशच्या अष्टपैलू रुमानाने आतापर्यंत 134 तर जहाआराने 130 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. गेल्या वर्षभराच्या कालावधीत या दोघींनाही बांगलादेश संघात स्थान मिळू शकले नाही. इशामा तांजिम व डावखुरी गोलंदाज नेहार यांनाही या स्पर्धेसाठी संधी देण्यात आली आहे. निगार सुल्तानाकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. महिलांची आशिया चषक 2024 ची क्रिकेट स्पर्धा लंकेतील डंबुलामध्ये 19 ते 28 जुलै दरम्यान खेळवली जाणार आहे.

Advertisement

बांगलादेश संघ - निगार सुल्ताना (कर्णधार), नेहादा अख्तर, मुर्शिदा खातुन, दिलारा अख्तर, रुमाना अहमद, रितू मोनी, मारुफा अख्तर, जहाआरा आलम, रबिया खान, सुल्ताना खातुन, रुबिया हैदर, शोमा अख्तर, इशामा तांजिम, सबिकुन नेहार, शोरिफा खातुन.

Advertisement
Tags :

.