कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बांगलादेशचा आयर्लंडवर मालिका विजय

06:29 AM Dec 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तानझीद हसन ‘सामनावीर’, तिसऱ्या सामन्यात आयर्लंड 8 गड्यांनी पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था / चेतोग्राम

Advertisement

यजमान बांगलादेशने आयर्लंड विरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेतील मंगळवारी झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात बांगलादेशने आयर्लंचा 8 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात सीमारेषेवर विक्रमी 5 झेल टिपणारा तसेच नाबाद अर्धशतक झळकविणारा व पाच झेल टिपण्याचा विक्रम करणारा तानझीद हसन याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. आयर्लंडचा  डाव 19.5 षटकात 117 धावांत आटोपला. त्यानंतर बांगलादेशने 13.4 षटकात 2 बाद 119 धावा जमवित मालिका आणि सामना जिंकला.

आयर्लंडच्या डावामध्ये कर्णधार स्टर्लिंगने 27 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 38, टिम टेक्टरने 10 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 17, डॉक्रेलने 23 चेंडूत 2 चौकारांसह 19, डिलेनीने 12 चेंडूत 10 धावा जमविल्या. स्टर्लिंग आणि टेक्टर यांनी सलामीच्या गड्यासाठी 24 चेंडूत 38 धावांची भागिदारी केली. आयर्लंडने पावरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 51 धावा जमविताना 2 गडी गमविले. 10 षटकाअखेर आयर्लंडने 4 बाद 66 धावा जमविल्या होत्या. आयर्लंडच्या डावात 2 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. बांगलादेश संघातील तानझीद हसनने सीमारेषेजवळ 5 झेल टिपले. बांगलादेशतर्फे मुस्ताफिजुर रेहमान आणि रिशाद हुसेन यांनी प्रत्येकी 3 तर शोरीफुल इस्लामने 21 धावांत 2 तसेच मेहदी हसन मिराज आणि सैफुद्दीन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशची सलामीची जोडी तानझीद हसन आणि सैफ हसन यांनी 24 चेंडूत 38 धावांची भागिदारी केली. सैफ हसनने 14 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 19 धावा जमविल्या. कर्णधार लिटॉन दास टेक्टरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 6 चेंडूत 1 चौकारांसह 7 धावा केल्या. तानझीद हसन आणि परवेज हुसेन इनॉम यांनी तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 72 धावांची भागिदारी करत विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. तानझीद हसनने 36 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 55 तर परवेज हुसेन इमॉनने 26 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 33 धावा जमविल्या. आयर्लंडतर्फे क्रेग यंग आणि हॅरी टेक्टर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. बांगलादेशच्या डावामध्ये 7 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकांत 48 धावा जमविताना 2 गडी गमविले. परवेज हुसेन आणि तानझीद हसन यांनी तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकीय भागिदारी 33 चेंडूत नोंदविली. हसनने 35 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक नेंदविले. तानझीद हसनने हे टी-20 मधील 11 वे अर्धशतक आहे.

संक्षिप्त धावफलक: आयर्लंड 19.5 षटकांत सर्वबाद 117 (स्टर्लिंग 38, टिम टेक्टर 17, डॉकरेल 19, डिलेनी 10, मुस्तफिजुर रेहमान व रिशाद हुसेन प्रत्येक 3 बळी, एस. इस्लाम 2-21, मेहदी हसन मिराज व सैफुद्दीन प्रत्येकी 1 बळी)., बांगलादेश 13.4 षटकात 2 बाद 119 (तानझीद हसन नाबाद 55, परवेज हुसेन इमॉन नाबाद 33, सैफ हसन 19, दास 7, यंग आणि हॅरी टेक्टर प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article