महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बांगलादेशकडून विंडीजला ‘व्हाईटवॉश’ची भेट

06:37 AM Dec 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेहदी हसन मिराज ‘मालिकावीर’, जाकेर अली ‘सामनावीर’

Advertisement

वृत्तसंस्था / किंग्जस्टन

Advertisement

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत बांगलादेशने यजमान विंडीजचा 3-0 असा एकतर्फी पराभव त्यांच्या भूमीत केला. बांगलादेशचा मेहदी हसन मिराजला ‘मालिकावीर’ तर जाकेर अलीला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात बांगलादेशने विंडीजचा 80 धावांनी दणदणीत पराभव केला.

या शेवटच्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 189 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजचा डाव 16.4 षटकात 109 धावांत आटोपला.

बांगलादेशच्या डावामध्ये जाकेर अलीने 41 चेंडूत 6 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 72 धावा झोडपल्या. परवेज हुसेन इमॉनने 21 चेंडूत 2 षटकार आणि 4 षटकारसह 39, मेहदी हसन मिराजने 23 चेंडूत 3 चौकारांसह 29, कर्णधार लिटन दासने 13 चेंडूत 3 चौकारांसह 14, टी. हसन शकीबने 12 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 17 धावा जमविल्या. बांगलादेशला 7 अवांतर धावा मिळाल्या. बांगलादेशच्या डावामध्ये 10 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. दास आणि इमॉन यांनी सलामीच्या गड्यासाठी 28 चेंडूत 44 धावांची भागिदारी केली. त्यानंतर मेहदी हसन मिराज आणि जाकेर अली यांनी 37 धावांची भागिदारी केली. टी. हसन शकीब आणि जाकर अली यांनी सातव्या गड्यासाठी 50 धावांची अर्धशतकी भागिदारी केल्याने बांगलादेशला 189 धावांपर्यंत मजल मारता आली. बांगलादेशने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 54 धावा जमविताना 2 गडी गमविले. बांगलादेशचे अर्धशतक 35 चेंडूत, शतक 74 चेंडूत, दीडशतक 107 चेंडूत फलकावर लागले. जाकेर अलीने 36 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. विंडीजतर्फे शेफर्डने 2 तर जोसेफ, चेस, मोती यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या शिस्तबद्ध आणि अचूक माऱ्यासमोर विंडीजचा डाव 16.4 षटकात 109 धावांत आटोपला. विंडीज संघातील चार फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. शेफर्डने 27 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारांसह 33, मोतीने 12 चेंडूत 1 षटकारासह 12, पुरनने 10 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 15 आणि चार्ल्सने 18 चेंडूत 4 चौकारांसह 23 धावा जमविल्या. विंडीजला 9 अवांतर धावा मिळाल्या. विंडीजच्या डावात 5 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. विंडीजने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 45 धावा जमविताना 3 गडी गमविले. विंडीजचे अर्धशतक 48 चेंडूत तर शतक 89 चेंडूत फलकावर लागले. बांगलादेशतर्फे रिशाद हुसेनने 21 धावांत 3, तस्किन अहमदने 30 धावांत 2, मेहदी हसनने 13 धावांत 2, टी. हसन शकीबने 31 धावांत 1 आणि हसन मेहमुदने 9 धावांत 1 गडी बाद केला. या सामन्यामध्ये मेहदी हसन मिराज या बांगलादेशच्या अष्टपैलूने दर्जेदार कामगिरी करत आपल्या संघाच्या विजयाला हातभार लावला.

संक्षिप्त धावफलक: बांगलादेश 20 षटकात 7 बाद 189 (जाकेर अली नाबाद 72, परवेज हुसेन इमॉन 39, मेहदी हसन मिराज 29, लिटन दास 14, टी. हसन शकीब 17, अवांतर 7, शेफर्ड 2-30, जोसेफ, चेस, मोती प्रत्येकी 1 बळी), विंडीज 16.4 षटकात सर्वबाद 109 (शेफर्ड 33, चार्ल्स 23, मोती 12, पूरन 15, अवांतर 9, रिशाद हुसेन 3-21, टी. अहमद 2-30, मेहदी हसन मिराज 2-13, टी. हसन शकीब 1-31, हसन मेहमुद 1-9).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#sports
Next Article