महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बांगडा 300 रुपये किलो

11:06 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आवक कमी झाल्याने दरामध्ये वाढ

Advertisement

बेळगाव : बांगडा उत्पादनात घट झाल्याने दर हळूहळू वाढू लागले आहेत. फिश मार्केटमध्ये बांगडा 300 ते 350 रुपये किलो झाला आहे. वाढत्या उन्हामुळे मासेमारी कमी झाली आहे. याचा परिणाम बांगडा दरावर झाला आहे. त्यामुळे बांगडा खवय्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. फिश मार्केटमध्ये विविध जातीचे मासे विक्री केले जातात. मात्र, सध्या माशांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे बांगडा दरात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. ऐन उन्हाळ्यात चिकनच्या दराचा देखील भडका उडाला आहे. 160 ते 170 रुपये किलो असणारे चिकन 280 रुपये झाले आहे. त्यापाठोपाठ बांगड्याचा दर देखील वाढला आहे. एरवी 150 ते 180 रुपये पर्यंत किलो मिळणारा बांगडा 300 ते 350 रुपये किलो झाला आहे. त्यामुळे बांगडे खवय्यांची निराशा झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article