‘अभियांत्रिकी’त बेंगळूरचा भवेश जयंती राज्यात प्रथम
सीईटीचा निकाल जाहीर : निकालात विद्यार्थीच आघाडीवर
बेंगळूर : अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक कोर्ससाठी कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने घेतलेल्या सामान्य प्रवेश परीक्षेचा (सीईटी) निकाल शनिवारी जाहीर झाला. अभियांत्रिकी विभागात बेंगळूरमधील भवेश जयंती याने प्रथम स्थान पटकावले आहे. उच्च शिक्षणमंत्री डॉ. एम. सी. सुधाकर यांनी निकाल जाहीर केला. निकालात मुलांनी बाजी मारली असून अभियांत्रिकी विभागात पहिले पाच रँक मुलांनीच मिळविले आहेत.
सीईटीत अभियांत्रिकीसाठी 2,62,195 रँक जाहीर करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बॅचलर ऑफ नॅच्युरोपॅथी अॅण्ड योगिक सायन्ससाठी (बीएनवायएस) 1,98,679, बीएससी अॅग्रीकल्चरसाठी 2,14,588, बीव्हीएससीसाठी 2,18,282, बी-फार्मासाठी 2,66,256, डी-फार्मासाठी 2,66,757 आणि बीएससी नर्सिंगसाठी 2,08,171 रँक जाहीर करण्यात आले आहेत.
2025-26 सालातील सीईटीसाठी 3.30 लाख अर्ज आले होते. भौतिकशास्त्रासाठी 3,11,691, रसायनशास्त्रासाठी 3,11,760, गणितसाठी 3,04,170 आणि जीवशास्त्र पेपरसाठी 2,39,459 जण बसले होते. यंदा परीक्षेवेळी मोबाईल अॅपद्वारे विद्यार्थ्यांची ओळख पटविण्याचे तंत्रज्ञान अंमलात आणले होते. त्यामुळे बोगस विद्यार्थी परीक्षेला बसण्यास पूर्णपणे आळा बसला.
भौतिकशास्त्राच्या पेपरसाठी दिला होता 1 ग्रेसमार्क
भौतिकशास्त्राच्या पेपरसाठी 1 ग्रेसमार्क देण्यात आला आहे. रसायनशास्त्रातील दोन प्रश्नांना दोन योग्य उत्तरे आणि जीवशास्त्रात एक प्रश्नाला दोन योग्य उत्तरे असल्याचा सल्ला तज्ञांनी दिला होता. त्यामुळे याची दखल घेण्यात आली आहे. यावेळी प्रथमच ओएमआर शीट ऑनलाईनवर उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी स्वत: ते तपासून पाहू शकतात, अशी माहिती मंत्री डॉ. एम. सी. सुधाकर यांनी दिली.
अभियांत्रिकी
प्रथम-भवेश जयंती, चैतन्य टेक्नो स्कूल, मारतहळ्ळी बेंगळूर, द्वितीय-सात्विक बी. बिरादार, चैतन्य टेक्नो स्कूल, उत्तरहळ्ळी बेंगळूर, तृतीय-दिनेश एस. अरुणाचलम, चैतन्य टेक्नो स्कूल, मारतहळ्ळी बेंगळूर.
बीएनवायएस
प्रथम-हरिश राज डी. व्ही., नारायण ई&-टेक्नो स्कूल, यलहंका बेंगळूर, द्वितीय-आत्रेय वेंकटाचलम, नॅशनल पब्लिक स्कूल, बेंगळूर, तृतीय-सफल एस. शेट्टी, एक्स्पर्ट कॉलेज, मंगळूर.
अॅग्रीकल्चर
प्रथम-अक्षय एम. डेगडे, अल्वास पदवीपूर्व महाविद्यालय, मुडबिद्री, द्वितीय-साईशरण पंडित, एक्स्पर्ट कॉलेज, मंगळूर, तृतीय-सुचित पी. प्रसाद, एक्स्पर्ट कॉलेज, मंगळूर.
अॅग्रीकल्चर प्रॅक्टीकल
प्रथम-किर्तना एम. एल., शारदांबा पदवीपूर्व महाविद्यालय, तुमकूर, द्वितीय-रक्षिता व्ही. पी., कल्याणनगर, बेंगळूर, तृतीय-अश्विनी यक्पुंडी, एक्सलन्स सायन्स कॉलेज, विजापूर.
नर्सिंग
प्रथम-राजू डी. व्ही., नारायण ई-टेक्नो स्कूल, यलहंका बेंगळूर, द्वितीय-आत्रेय वेंकटाचलम, नॅशनल पब्लिक स्कूल, बेंगळूर, तृतीय-सफल एस. शेट्टी, एक्स्पर्ट कॉलेज, मंगळूर.
पशूवैद्यकीय
प्रथम-हरिश राज डी. व्ही., नारायण ई&-टेक्नो स्कूल, यलहंका बेंगळूर, द्वितीय-आत्रेय वेंकटाचलम, नॅशनल पब्लिक स्कूल, बेंगळूर, तृतीय-सफल एस. शेट्टी, एक्स्पर्ट कॉलेज, मंगळूर.