बेंगळूर-पुणेरी पल्टन आज लढत
वृत्तसंस्था/ चेन्नई
2024 च्या अल्टिमेट सांघिक टेबल टेनिस स्पर्धेतील येथील जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियममध्ये पीबीजी बेंगळूर स्मॅशर्स आणि पुणेरी पल्टन या दोन संघांमध्ये सलामीची लढत सोमवारी होत आहे.
चेन्नई लायन्स आणि अहमदाबाद पाईपर्स या संघाविरुद्ध बेंगळूर स्मॅशर्स आणि पुणेरी पल्टन यांनी आपले पहिले सामने जिंकले होते. जीत चंद्रा आणि ऐहिका मुखर्जी हे पुणेरी पल्टन संघातील प्रमुख खेळाडू आहेत. या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांचे फ्रांचाईजी यांनी निरज बजाज व विटा दाणी यांच्या सहकार्यांने तसेच अखिल भारतीय टेबल टेनिस फेडरेशनच्या मदतीने या लीग स्पर्धेला अधिक प्राधान्य मिळत आहे.
बेंगळूर स्मॅशर्सने आपल्या सलामीच्या लढतीमध्ये यजमान चेन्नई लायन्सचा 11-4 असा पराभव केला होता. या लढतीमध्ये बेंगळूर स्मॅशर्सच्या जीतने अचंता शरथ कमलचा 3-0 असा पराभव केला होता. बेंगळूरच्या विजयामध्ये जीतचा वाटा महत्त्वाचा ठरला. पुणेरी पल्टन संघाने आपल्या सलामीच्या लढतीत अहमदाबाद पीपेर्सचा 10-5 असा पराभव केला. या स्पर्धेत पहिल्यांदाच अहमदाबाद पीपेर्सने आपला सहभाग दर्शविला आहे. बेंगळूर स्मॅशर्स संघामध्ये मनिका बात्रा, स्पेनची अल्वारो रॉबलेस, अमेरिकेची लिली झेंग, जीत चंद्रा, तनिशा कोटेचा, अमलराज अँथोनी तर पुणेरी पल्टन संघामध्ये ऐहिका मुखर्जी, पोलंडची नातालिया बेजोर, पोर्तुगालचा जो माँटेरो, अंकुर भट्टाचार्यजी, अनिरबन घोष आणि याशिनी शिवशंकर यांचा समावेश आहे.