For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेंगळूर-कामाख्या एक्स्प्रेस रुळावरून घसरली

06:45 AM Mar 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेंगळूर कामाख्या एक्स्प्रेस रुळावरून घसरली
Advertisement

ओडिशात नेरगुंडी रेल्वेस्थानकाजवळ अपघात : 11 एसी डबे घसरले; 1 मृत, 25 जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/ कटक

ओडिशामध्ये पुन्हा एकदा मोठा रेल्वे अपघात झाला आहे. कर्नाटकमधील बेंगळूर आणि आसामदरम्यान धावणाऱ्या कामाख्या एक्स्प्रेसचे 11 एसी डबे रुळावरून घसरल्यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. नेरगुंडी रेल्वेस्थानक परिसरातील मंगुली पॅसेंजर हॉल्टजवळ एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याचे सांगण्यात आले. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून जवळपास 25 जण जखमी झाले आहेत. बचावकार्यासाठी एनडीआरएफ आणि वैद्यकीय पथके पाठवण्यात आली होती. अपघातामागील नेमके कारण प्रथमदर्शनी स्पष्ट करण्यात आले नसले तरी चौकशीसाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Advertisement

ओडिशातील कटकमधील चौद्वारजवळ रविवार, 30 मार्च रोजी सकाळी 11.54 वाजता बेंगळूर-कामाख्या सुपरफास्ट एक्स्प्रेस रुळावरून घसरली. ट्रेनचे 11 एसी डबे रुळावरून घसरल्यानंतर नीलाचल एक्स्प्रेस, धौली एक्स्प्रेस, पुरुलिया एक्स्प्रेसचे मार्ग वळवण्यात आले. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरू करण्यात आले. वैद्यकीय पथक, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी बचावकार्यात गुंतले होते. अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

पूर्व किनारपट्टी रेल्वेकडून पुष्टी

पूर्व किनारपट्टी रेल्वेचे सीपीआरओ अशोक कुमार मिश्रा यांनी एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याची पुष्टी केली आहे. कटकमधील नेरगुंडी रेल्वेस्थानकाजवळ कामाख्या एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले आहेत, असे मिश्रा म्हणाले.  या दुर्घटनेनंतर 8455885999 आणि 8991124238 हे हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले.

Advertisement
Tags :

.