For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेंगळूर ब्लास्टर्सचा सलग तिसरा विजय

06:22 AM Aug 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेंगळूर ब्लास्टर्सचा सलग तिसरा विजय
Advertisement

वृत्तसंस्था/बेंगळूर

Advertisement

केएससीएच्या महाराजा चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेंगळूर ब्लास्टर्सने शिमोगा लायन्सचा 7 गड्यांनी दणदणीत पराभव करुन आपला सलग तिसरा विजय नोंदविला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना शिमोगा लायन्सने 20 षटकात 9 बाद 163 धावा जमविल्या. हार्दिक राजने 33 चेंडूत 69 तर धुरीने 15 चेंडूत 29 धावा जमविल्या. बेंगळूर ब्लास्टरतर्फे शुभांग हेगडे आणि कौशल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्यानंतर बेंगळूर ब्लास्टर्सने 17.2 षटकात 3 बाद 168 धावा जमवित आपला विजय नोंदविला. बेंगळूर ब्लास्टर संघातील भुवन राजूने 36 चेंडूत 59 तर मयांक अगरवालने 34 चेंडूत 42 तर चेतनने 12 चेंडूत 23 धावा झोडपल्या.

Advertisement

संक्षिप्त धावफलक: शिमोगा लायन्स 20 षटकात 9 बाद 163, बेंगळूर ब्लास्टर्स 17.2 षटकात 3 बाद 168

Advertisement
Tags :

.