महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेंगळूर बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास एनआयएकडे

06:09 AM Mar 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

मागील आठवड्यात बेंगळूरच्या कुंदहलळ्ळी येथील रामेश्वरम कॅफेमध्ये घडलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास पथकाकडे (एनआयए) सोपविण्यात आला आहे. यापूर्वी तो केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पोलिसांकडे सोपविण्यात आला होता. आता एनआयएकडे प्रकरण सोपविण्यात आले आहे. एक-दोन दिवसात एनआयएचे अधिकारी तपास हाती घेतील.

Advertisement

रामेश्वरम कॅफेमधील बॉम्बस्फोट प्रकरणी बेंगळूरच्या एचएएल पोलीस स्थानकात युएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. बेंगळूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सीसीबीकडे वर्ग केला. आता प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एनआयएने स्वतंत्रपणे गुन्हा दाखल केला आहे.

प्रकरण एनआयएकडे हस्तांतर करण्यात आल्यानंतर फॉरेन्सिक लॅबच्या टीमने सोमवारी पुन्हा रामेश्वरम कॅफेला भेट देऊन तेथील नमुने गोळा केले. स्फोटानंतर तेथे आढळलेल्या सर्व वस्तूंचे नमुने जमा करून पडताळले जात आहेत. त्यामुळे राज्य सरकारने लवकरच अंतिम अहवाल हाती येईल. त्यानंतर अहवाल उघड केला जाईल, असे सांगितले आहे.

बसस्थानकावर बॉम्बस्फोटासाठी टायमर सेट

बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर तपास यंत्रणा सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने माहिती जमा करत आहे. संशयित आरोपीने बसस्थानकावरच बॉम्बसाठी टायमर सेट केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बेंगळूरच्या व्हाईटफिल्ड परिसरातील रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी दुपारी अज्ञात व्यक्तीने स्फोटके भरलेली बॅग ठेवली होती. सदर व्यक्ती तेथून बाहेर पडल्यानंतर काही वेळातच 10 सेकंदाच्या अंतराने दोन स्फोट झाले. या घटनेत 9 जण जखमी झाले होते. स्फोट घडविणाऱ्या संशयित आरोपीने 1 मार्च रोजी सकाळी 10:43 वाजता बसस्थानकावर बॉम्बला टायमर सेट केला. जनतेच्या भीतीविना त्याने हे कृत्य केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे.

कारागृहातील संशयितांशी कनेक्शन?

बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांनी बेंगळूरच्या परप्पन अग्रहार कारागृहातील संशयित दहशतवाद्यांचे कनेक्शन आहे का, याचा तपास सुरू केला आहे. तेथील आरोपींची  कारागृहात भेट घेतलेल्यांची माहिती जमा केली जात आहे. 19 नोव्हेंबर 2022 मधील मंगळूरमधील कुकर बॉम्बस्फोट आणि 2022 मधील तामिळनाडूच्या कोईम्बत्तूर येथील कोट्टाय येथील बॉम्बस्फोट प्रकरणांचा रामेश्वरम कॅफेतील स्फोटाशी साम्य असल्याने तपास पथकाने या दिशेनेही तपास सुरू केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article