महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बॅनर्जी सरकारवर पुन्हा कठोर ताशेरे

06:16 AM Aug 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वैद्यकीय महाविद्यालय हल्ला प्रकरण सीबीआयकडे

Advertisement

वृत्तसंस्था / कोलकाता

Advertisement

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पश्चिम बंगाल राज्यसरकार अपयशी ठरल्याचे दिसत आहे. आर. जी. कार महाविद्यालयावर हिंसक जमावाकडून झालेला हल्ला हे त्याचे उदाहणर आहे, असे जळजळीत ताशेरे पुन्हा एकदा कलकत्ता उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारवर ओढले आहेत. या हल्ल्याची चौकशीही सीबीआयच्या हाती सोपविण्याचा आदेश देण्यात आला आहे.

याच महाविद्यालयात एका महिला डॉक्टरवर क्रूर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशीही सीबीआयकडे देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर या महाविद्यालयावर स्वातंत्र्यदिनीच हजारो दंगेखोर लोकांच्या जमावाने हल्ला करुन महाविद्यालयात मोठी मोडतोड केली आहे. डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पुरावे सीबीआयला मिळू नयेत म्हणून हा हल्ला करण्यात आला होता काय, अशी टोकदार पृच्छाही उच्च न्यायालयाने केली. तसेच महाविद्यातील सर्व विद्यार्थ्यांना हटवावे. डॉक्टर हत्या प्रकरणी सीबीआय तपास होईपर्यंत कोणताही बदल करु नये. सीबीआयला काम करण्यास अनुकूल परिस्थिती राखण्याचे उत्तरदायित्व राज्य सरकारचे आहे, अशीही टिप्पणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीत राज्य सरकारला उद्देशून केली.

भारतीय जनता पक्षाची टीका

डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठीच तृणमूल काँग्रेसच्या पाठिंब्याने गुरुवारचा हल्ला करण्यात आला, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. राज्यात ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधात वातावरण तापत आहे. त्यात या क्रूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची भर पडू नये म्हणून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात आहे. महाविद्यालयावरील हल्ला तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनीच केला हे स्पष्ट दिसत आहे. हे राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी आहे, अशी टीकाही या पक्षाने केली.

आणखी अटका शक्य

या बलात्कार-हत्या प्रकरणात एकाहून अधिक गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता सीबीआयने वेगाने चौकशी केली जात आहे. एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी सीबीआयकडून आणखी संशयितांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच या प्रकरणाचा सूत्रधार कोण आणि त्याची पाळेमुळे कोठपर्यंत पोहचली आहेत, यावर प्रकाश पडणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article